एक्स्प्लोर
प्रेमात फसवणूक, तरुणीची आत्महत्या, आरोपीची आईला धमकी
नांदेड : तीन महिन्यांपूर्वी प्रेमप्रकरणात फसवणूक झाल्यानं नांदेडमधल्या 18 वर्षीय प्रियांका भुसेवारनं आत्महत्या केली होती. मात्र आता तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीवरील गुन्हा मागे घ्यावा, यासाठी आरोपीच्या वडिलांनी प्रियंकाच्या आईला धमकावण्यास सुरुवात केली आहे.
आमीर खान नावाच्या तरुणानं प्रेमात फसवल्यामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी आत्महत्येपूर्वी प्रियंकाने लिहिली होती. त्या सुसाईड नोटनुसार आणि प्रियांकाच्या आईच्या फिर्यादीनुसार आमीर खानविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता तीन महिन्यांनंतर हा गुन्हा मागे घ्यावा यासाठी आमीरच्या वडिलांनी प्रियांकाच्या आईला धमकवायला सुरुवात केलीय. आमीरचे वडिल अब्बास खान यांचा मटक्याचा धंदा आहे. त्यामुळे पोलिसांची त्यांचे चांगलेच लांगेबांधे असल्यानं पोलिसही या प्रकरणात सहकार्य करत नसल्याचा आरोप प्रियांकाच्या आईनं केलाय.
आरोपी आमीर खान आणि त्याच्या पित्याने प्रियंकाच्या आईच्या घरात घुसून दहशत निर्माण केली आहे. आरोपीने तलवार, दगडाचे तुकडे घेऊन ठार मारण्याची धमकी दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दहशतीमुळे हे कुटुंब आता नातेवाईकाच्या घरी लपून बसले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement