एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...तर हत्यारं उचलायला घाबरु नका, कोपर्डी प्रकरणावर नानांचा संताप
पुणे : अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार आणि हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलं आहे. यावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत असताना, अभिनेता नाना पाटेकर यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. अत्याचाराच्या घटनांवेळी स्वरक्षणासाठी हत्यार उचलावं लागलं, तरी मागे-पुढे पाहू नका, असं नाना म्हणाले.
पुण्यातील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुलींनी अशा घटनांचा प्रतिकार केला पाहिजे. तसंच स्वरक्षणासाठी एखादी गोष्ट केली तर कायद्याने तुम्हाला काहीही होणार नाही, असं मत नानांनी व्यक्त केलं आहे.
अत्याचार होत असताना मुलींनी प्रतिकार करायलाच हवा. मात्र तरुणांनीही अशा विकृतींना ठेचलं पाहिजे. जिच्यावर अत्याचार होत आहे, ती आपली बहिण, वहिनी, आई आहे, असं समजून त्यांनी तिचं संरक्षण करायला हवं, असंही नाना पाटकेर यांनी सांगितलं.
कोपर्डी प्रकरणाला जातीयरंग दिला जात असल्याचा आरोप होत आहे. मात्र जात हा कॉलमच हटवायला पाहिजे. भारतीय ही एकच जात असल्याचं प्रत्येकाने मानलं पाहिजे, असंही नाना म्हणाले.
महाराष्ट्र विधानसभेत पडसाद
दरम्यान राज्य अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही कोपर्डी बलात्कार प्रकरणाचे पडसाद उमटण्याचे संकेत आहेत. कारण, विरोधक विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार आहेत.
इतर विषय बाजूला ठेवून कोपर्डी प्रकरणावर चर्चा व्हावी, अशी मागणी काल विरोधकांनी केली होती. मात्र त्याला विधानसभाध्यक्षांनी नकार दिल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे.
कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार
13 जुलैला कोपर्डीतील नववीत शिकणारी अल्पवयीन मुलगी आजोबांच्या घरुन आपल्या स्वत:च्या घरी जात होती. त्यावेळी तिघांनी शेतात ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला. तिची हत्या करण्याआधी तिच्या देहाची क्रूर विटंबनाही केली होती. याप्रकरणी जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या नराधमांना अटक करण्यात आली आहे. दोघांना 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ
संबंधित बातम्या
कोपर्डी बलात्कार: विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव?
कोपर्डी बलात्कार: तुमची -आमची मुलगी समजून कारवाई करा : अजित पवार
नगरमध्ये बलात्कार आणि हत्या, हजारो ग्रामस्थ रस्त्यावर
कोपर्डी प्रकरण: राम शिंदेंसोबत फोटोत असलेली ‘ती’ व्यक्ती आरोपी नाही
आरोप करणाऱ्यांनी राम शिंदेंची जाहीर माफी मागावी: मुख्यमंत्री
राम शिंदे फोटो प्रकरणावर धनंजय मुंडेंकडून दिलगिरी
मुख्यमंत्र्यांना आर्चीला भेटायला वेळ, मात्र पीडित कुटुंबीयांसाठी नाही : तृप्ती देसाई
कोपर्डी बलात्कारातील आरोपीचा राम शिंदेंसोबत फोटो, राष्ट्रवादीचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement