एक्स्प्लोर
नागपुरात बोअरवेलच्या दुरुस्तीवेळी साखळी तुटून चिमुरड्याचा मृत्यू
नागपूर : नागपुरात जुन्या बोअरवेलची दुरुस्ती करताना एका 4 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. अरमान उर्फ अलफैज अली पटेल असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बालकाचं नाव आहे.
मंगळवारी दुपारी नागपूरच्या महाल परिसरात नाईक रोड जवळ बालाजी रेसीडेन्सी या इमारतीत जुन्या बोअरवेलच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. इमारतीच्या दाराजवळ असलेल्या बोअरवेलमध्ये असलेली जुनी मोटर काढली जात असताना ही घटना घडली.
बोअरवेलच्या आत अडकलेली मोटर साखळी बांधून ट्रॅक्टरने ओढली जात होती. त्यावेळी लोखंडी साखळी तुटली आणि शेजारी उभ्या असलेल्या 4 वर्षीय अरमानच्या छातीवर लागली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात तणाव असून नागरिकांनी दोषी कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली आहे. काही वाहनांच्या काचाही संतप्त नागरिकांनी फोडल्या. परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त लावला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement