एक्स्प्लोर

याचिका फेटाळताना मुंबई सत्र न्यायालयाचे खडे बोल, पैसा पक्षाकडे जमा केल्याची सोमय्यांची माहिती

Kirit Somaiya : विक्रांत बचाव मोहिमेतून गोळा केलेला निधी कुठे गेला?, हे पाहणं तुमचीच जबाबदारी होती

Kirit Somaiya : आयएनएस विक्रांत बचाव या मोहिमेसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत मुंबई सत्र न्यायालयानं त्यांची अटकपूर्व जामीनासाठीची याचिका फेटाळून लावलीय. याप्रकरणी सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्या यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर उद्या मंगळवारी निकाल देऊ असं विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केलं. विक्रांत बचावसाठी गोळा केलेला निधी हा सर्वपक्षांकडनं गोळा करण्यात आला होता. तसेच राजभवनाकडे कोणतंही बँक खात नसल्यानं तो निधी आमच्या पक्षाकडे जमा केला, त्यानंतर त्याचं काय झालं माहिती नाही?. अशी भूमिका सोमय्या यांच्यावतीनं मांडण्यात आली. मात्र जर तुम्ही लोकांकडनं निधी गोळा केलात तर ती तुमची जबाबदारी होती की, तो योग्य ठिकाणी जातोय की नाही यावर लक्ष देणं. त्यामुळे तो कुठे याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्हाला आम्ही कोणताही दिलासा देऊ शकत नाही. असं कोर्टानं किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना स्पष्ट केलंय. सोमय्या यांच्यावतीनं आता या निकालाला तातडीनं हायकोर्टात आव्हान दिलं जाणार आहे.

राज्य सरकारचा युक्तिवाद -
याप्रकरणी माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून ईओडब्ल्यूच्यावतीनं विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद करताना स्पष्ट केलं की, तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार त्यानं दिलेला मदतनिधी हा किरीट सोमय्या आणि नील सोमय्याच्या लोकांनी गोळा केला होता. याशिवाय सोशल मीडियावर चर्चगेट, दादर, भांडूप, मुलूंड अश्या विविध रेल्वे स्थानकांबाहेर हा निधी गोळा करण्यात आल्याची अनेक छायाचित्र आहेत. अनेक दिवस ही वर्गणी गोळा करण्याचा कार्यक्रम सुरू होता, ज्यात स्टीलच्या एका पेटीत लोकं येताजाता पैसे टाकत होते. आणि यातनं केवळ 11 हजारांच्या आसपास निधी गोळा झाल्याचा जर सोमय्यांचा दावा आहे तर तो हास्यास्पद आहे. कारण तक्रारदार भोसले यांनीच त्यात दोन हजार रूपये टाकले होते, याशिवाय अन्य काही लोकांनीही हाजारांमध्ये देणगी दिलीय. त्यामुळे 11 हजारांची रक्कम तर चर्चगेट स्टेशनबाहेर एका दिवसांत जमा झाले असतील. तसेच तक्रारदार हा माजी सैनिक आहे, तेव्हा त्यांच्या हेतूनवर सवाल उठवणंच चुकीच ठरेल. देशावरील, सैन्यावरील प्रेमापोटी लोकांनी हा पैसा दिला होता. त्यामुळे त्याचं नेमकं काय झालं याचा तपास होणं आवश्यक आहे. हा पैसा कुणाच्या खात्यात गेला?, त्यातनं काही मालमत्ता विकत घेतलीय का?, याची चौकशी करण्यासाठी आरोपींच कस्टडी मिळणं आवश्यक असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं.
 
सोमय्याचा बचावासाठी युक्तिवाद -
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सध्या या दोन पक्षा मोठा राजकिय वाद सुरूय. त्यामुळेच या दोन पक्षांतील नातेसंबंध खराब झालेत, हे जगजाहीरय आणि म्हणूनच हे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत हे काही वेगळं सांगायला नको. असा युक्तिवाद सोमय्या यांच्यावतीनं जेष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी केला. तसेच साल 2013-14 मध्ये गोळा केलेल्या वर्गणीची साल 2022 मध्ये पावती मागणं यावरून तक्रारदाराच्या हेतूवरही सवाल निर्माण होतो असं ही ते म्हणाले. याशिवाय हा मदतनिधी 57 कोटींचा होता असा जर दावा करण्यात येत असेल तर जर रस्त्यांवर उभं राहून इतका निधी गोळा होऊ शकतो का?, असा सवाल उपस्थित करत आपण केवळ 11 हजारांच्या आसपास निधी गोळा केला होता असा खुलासा किरीट सोमय्या यांनी कोर्टात केला आहे. किरीट सोमय्यांनी वारंवार महाविकास आघाडी सरकारवर पुराव्यांनिशी आरोप केले आहेत. त्यानंतर पलटवार करताना "बापबेटा जेल जाएंगे", या आशयाची विधानं गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. त्याच दबावाखाली हा गुन्हा दाखल झालाय असा आरोपही सोमय्यांच्यावतीनं कोर्टात करण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : 'इंडिया'आघाडी दिल्लीत फुटणार? ते मुंबईतील रखडलेल्या पुलांची समस्याZero Hour Mumbai Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे :मुंबईत रखडलेल्या पुलांची समस्या अन् वाहतूक कोंडीZero Hour :विरोधकांची इंडिया आघाडी दिल्लीत फुटणार? Anand Dubey Atul Londhe Keshav Upadhyay EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget