एक्स्प्लोर

Morning Headlines 25th July : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

मुंबईतील अंधेरी पूर्व भागात दरड कोसळली, चार ते पाच घरांवर डोंगराचा ढिगारा; जीवितहानी नाही

Mumbai Andheri Landslide : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील दरड दुर्घटना ताजी असतानाच मुंबईतील अंधेरी पूर्व चकाला परिसरात रामबाग सोसायटीमध्ये दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास रामबाग सोसायटीच्या बाजूला असलेल्या डोंगरामधून सोसायटीच्या पहिला मजल्यावरील चार ते पाच फ्लॅटमध्ये डोंगराच्या ढिगारा गेला. मध्यरात्री दोनच्या सुमारास घरांमधील सर्व नागरिक झोपेत असताना ही दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. सुदैवाने या दरड दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाचा सविस्तर

मणिपूर हिंसाचारावरुन संसदेत घमासान, 'या' चार मुद्द्यांवरुन सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

Parliament Monsoon Session 2023 : एकीकडे मणिपूरमधील नागरिक सध्या जीव मुठीत घेऊन जगत आहेत तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत मणिपूर हिंसाचारावर घमासान सुरु आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मणिपूरच्या मुद्द्यावरुन संसदेत  प्रचंड गदारोळ झाला. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन द्यावं या मागणीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी निदर्शने केली. वाचा सविस्तर

हिंसाचारानंतर मणिपूरवर आणखी एक संकट, 700 हून अधिक म्यानमारच्या नागरिकांची घुसखोरी

Manipur Violence : मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर एका नव्या संकटाची चाहूल लागली आहे. 22 आणि 23 जुलै रोजी म्यानमारच्या 700 हून अधिक नागरिकांनी अवैधरित्या मणिपूरमध्ये घुसखोरी केली. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान या नागरिकांनी कागदपत्रांशिवाय राज्यात कसा प्रवेश केला आणि त्यांना येथे येण्याची परवानगी कोणी दिली ही माहिती राज्य सरकारने मागितली आहे. वाचा सविस्तर 

न्या. देवेंद्र उपाध्याय मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती

Bombay High Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  केंद्र सरकारने या निर्णयावर आपली मोहर उमटवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने काही दिवसांपूर्वी ही शिफारस केली होती. त्यावर  केंद्र सरकारतर्फे राष्ट्रपतींनी सोमवार (25 जुलै) रोजी शिक्कामोर्तब करत तशी अधिसूचना जारी केली आहे. वाचा सविस्तर

शहरी भागात वृक्ष लागवडीला सरकारचं प्रोत्साहन, नगर वन योजनेद्वारे 2020 पासून आतापर्यंत 385 प्रकल्पांना मंजुरी

Tree Planting : वृक्ष लागवड करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून वृक्ष लागवडीचे काम सुरु आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने, देशातील शहरी भागांसह सर्वत्र वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजनांद्वारे उपक्रम हाती घेतले आहेत. 2020 साली नगर वन योजना (NVY) हा उपक्रम शहरी भागात नागरी वनांच्या निर्मितीसाठी सुरु करण्यात आला आहे. ही योजना स्थानिक समुदाय, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादींना समावून घेत शहरी वनीकरणाला प्रोत्साहन देते. वाचा सविस्तर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होणार? अजामीनपात्र वॉरंट जारी

Pakistan Imran Khan Arrest Warrant : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने सोमवार (24 जुलै) रोजी इम्रान खान यांच्याविरोधात अवमानना केल्याप्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वाचा सविस्तर

वृश्चिक, कर्क, कुंभ आणि मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Horoscope Today 25 July 2023 : आज वार मंगळवार दिनांक 25 जुलै 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. वृश्चिक, कर्क, कुंभ आणि मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहील. वाचा सविस्तर

जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म, भारताला मिळाल्या पहिल्या महिला राष्ट्रपती, इतिहासात आज

Today In History : आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. आज म्हणजे 25 जुलै रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी 1997 मध्ये के. आर. नारायणन यांनी भारताचे दहावे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्याशिवाय जगातील पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म झाला होता. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत, त्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar : ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
Aaditya Thackeray : बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 22 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :22 ऑगस्ट 2024 : ABP MajhaManoj jarange Jalna: मनोज जरांगेंचं जनसंपर्क कार्यालय काही  दिवसांत तयार होणारBadlapur Case : आरोपी अक्षय शिंदेच्या आई वडिलांचा  खळबळजनक आरोप; बदलापूर अत्याचार प्रकरणात ट्विस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Bigg Boss Marathi Season 5 Jahnavi Killekar : ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
ढसाढसा रडत जान्हवीने पॅडीची माफी मागितली, नेटकरी म्हणतात, हे तर सगळं...
Aaditya Thackeray : बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
बदलापूरमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करणारा जनरल डायर कोण? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम
'...तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'; पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी शरद पवारांचा अल्टिमेटम
Badlapur School Akshay Shinde: बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी
बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या घरी तोडफोड, गावकऱ्यांनी कुटुंबीयांना हुसकावून लावले, घरात सापडली खेळणी
OTT Release This Week : 'कल्की एडी 2898' ते 'रायन', या आठवड्यात ओटीटीवर एंटरटेन्मेंटची मेजवानी; पाहा यादी...
'कल्की एडी 2898' ते 'रायन', या आठवड्यात ओटीटीवर एंटरटेन्मेंटची मेजवानी; पाहा यादी...
चल तुला चॉकलेट देतो, चिमुकलीला आमिष दाखवून घरात नेलं, अन्...; शेजाऱ्याकडून मुलीवर अत्याचार
चल तुला चॉकलेट देतो, चिमुकलीला आमिष दाखवून घरात नेलं, अन्...; शेजाऱ्याकडून मुलीवर अत्याचार
मुंबईच्या गणेशोत्सवात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा 'ग्रीन कॉरीडोर'; नेमकी संकल्पना काय?
मुंबईच्या गणेशोत्सवात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांचा 'ग्रीन कॉरीडोर'; नेमकी संकल्पना काय?
Embed widget