एक्स्प्लोर

Horoscope Today : वृश्चिक, कर्क, कुंभ आणि मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

आज वार मंगळवार दिनांक 25 जुलै 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे.

Horoscope Today 25 July 2023 : आज वार मंगळवार दिनांक 25 जुलै 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. वृश्चिक, कर्क, कुंभ आणि मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहील.


मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे. तुम्हाला आज काही शुभ बातम्या ऐकायला मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर क्षेत्रात रस निर्माण होऊ शकतो. तुमचा मुलगा आज तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याची शक्यता आहे. 

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शहाणपणाने वागण्याचा असणार आहे. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात योग आणि व्यायामाला सुरुवात करा. तुमच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या. जर तुम्ही आर्थिक दृष्टीकोनाबद्दल चिंतित असाल तर तुमची ती समस्या देखील आज दूर होईल. 

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्वाचा असणार आहे. आर्थिक व्यवहारात काही अडचण आली असेल तर ती आज दूर होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत काळजी कराल. तुमच्या मित्रांची संख्या देखील आज वाढेल. पण तुम्हाला आज सावध राहावं लागेल. तुम्ही प्रवासाला जात असाल तर त्यामध्ये तुमच्या मौल्यवान वस्तूंचे रक्षण करा, अन्यथा नुकसान किंवा साहित्य चोरीला जाण्याची भीती आहे. 

कर्क 

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मान-सन्मान वाढवणारा आहे. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. तुमची किर्ती सर्वत्र पसरेल. आज तुम्ही कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवा. आज कुटुंबातील काही चांगल्या कार्यक्रमामुळं वातावरण एखाद्या उत्सवासारखे असेल. त्यामुळं तुम्ही आज आनंदी असाल. 

सिंह

आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांना आज गती मिळेल. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कोणत्याही नवीन कामात गुंतवणूक करण्याची संधी मिळाल्यास ते विचारपूर्वक करा. आधुनिक कामांमध्ये तुमची आवड वाढेल. 

कन्या

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चिक असणार आहे. आज एखादे मोठे ध्येय पूर्ण केल्यावर तुम्ही आनंदी व्हाल. स्पर्धेची भावना आज तुमच्यात राहील, त्यामुळं तुम्ही आवश्यक कामाला गती द्याल. विद्यार्थ्यांची बौद्धिक आणि मानसिक ओझ्यापासून सुटका होताना दिसत आहे.  

तूळ

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज तुम्हाला वरिष्ठ सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला तुमची दिनचर्या बदलण्याची गरज नाही. अन्यथा समस्या येऊ शकते. कार्यक्षेत्रात कोणत्याही कामाशी संबंधित समस्या असल्यास त्यामध्ये तुम्ही तुमच्या वरिष्ठांची मदत घेऊ शकता. आज तुम्हाला काही महत्त्वाच्या व्यावसायिक कामासाठी अचानक प्रवासाला जावे लागेल. 

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धैर्य आणि प्रगती वाढवणारा आहे. तुम्ही मोठेपणा दाखवत लहानांच्या चुका माफ कराल. तुम्हाला कोणतीही चांगली बातमी ऐकायला मिळाली तर ती लगेच ती कोणाला सांगू नका. कुटुंबातील तुमच्या जबाबदाऱ्यांकडे पूर्ण लक्ष द्या, अन्यथा तुमचे पालक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. तुमच्या मनातील कोणतीही गोष्ट तुम्ही तुमच्या लाइफ पार्टनरसोबत शेअर करू शकता. कोणाकडूनही पैसे उधार घेणे टाळा.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज तुम्ही स्पर्धेच्या क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. तुम्हाला व्यावसायिक योजनांचा पूर्ण लाभ मिळेल. सर्वांच्या सहकार्याने तुम्ही पुढे जाल. कोणत्याही कामात जोखीम पत्करु नका, अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकते. 

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. तुम्ही आज संयमाने राहा. तुम्हाला आज काही फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहावे लागेल, अन्यथा ते तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर पूर्ण लक्ष केंद्रित करा, अन्यथा समस्या येऊ शकते. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना आज काही नवीन करारांचा फायदा होईल. संपत्तीशी संबंधित कोणतेही प्रकरण चालू असेल तर त्यात तुमच्या बाजूनं निर्णय लागेल. तुम्ही तुमच्या जेवणात सात्विक आहार घ्यावा, अन्यथा तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. तुमची नेतृत्व क्षमता वाढेल. आज कामावर लक्ष केंद्रित करा. इकडे-तिकडे बसून तुमचा मोकळा वेळ वाया घालवू नका, अन्यथा तुम्हाला नंतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. 

मीन

मीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामांना पूर्ण वेळ द्याल. कोणत्याही सरकारी योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी तुम्ही त्यातील नियमांकडे लक्ष दिले पाहिजे, अन्यथा तुम्हाला नंतर अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल, ज्यामुळं तुम्ही आनंदी व्हाल आणि जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर तुम्हाला ते पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget