एक्स्प्लोर

Parliament Monsoon Session : नियम 267 आणि 176 वरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान, 'या' चार मुद्द्यांवरुन सरकार-विरोधक आमनेसामने

Parliament Monsoon Session 2023 : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मणिपूरच्या मुद्द्यावरुन संसदेत प्रचंड गदारोळ झाला.

Parliament Monsoon Session 2023 : एकीकडे मणिपूरमधील (Manipur) नागरिक सध्या जीव मुठीत घेऊन जगत आहेत तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत मणिपूर हिंसाचारावर घमासान सुरु आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मणिपूरच्या मुद्द्यावरुन संसदेत (Parliament) प्रचंड गदारोळ झाला. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी निवेदन द्यावं या मागणीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांनी निदर्शने केली.

मणिपूरच्या मुद्द्यावरुन संसदेत तीन दिवसांपासून गदारोळ सुरु आहे. राज्यसभेत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे. मणिपूर हिंसाचारावर सरकार सभागृहात आपली भूमिका मांडण्यास तयार आहे, असं सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. परंतु हे प्रकरण तांत्रिक मुद्द्यावर अडकलं आहे.

नियम 267 आणि नियम 176 म्हणजे काय?

आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असं सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे, मात्र हे प्रकरण चर्चेच्या नियमावरच अडकलं आहे.  नियम 267 अन्वये चर्चा झाली पाहिजे, त्यानंतर मतदानाची तरतूद आहे, अशी विरोधकांची मागणी आहे. मात्र सरकार यासाठी तयार नाही. सरकारला नियम 176 अन्वये चर्चा करायची आहे, कारण त्यानंतर मतदान होत नाही.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एका निवेदनात म्हटलं की, "विरोधकांनाच चर्चा करायची नाही, ते चर्चेपासून दूर पळत आहेत कारण चर्चेच त्यांना त्यांच्या राज्यात महिलांसोबत घडणाऱ्या घटनांबद्दलही बोलावं लागेल. काँग्रेसला राजस्थान, छत्तीसगड आणि बंगालमधील महिलांसोबत झालेल्या  घटनांबाबत चर्चा करायची नाही."

या मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधी पक्ष आमनेसामने

या प्रकरणात अनेक पेच आहेत. पहिला मुद्दा म्हणजे विरोधकांना फक्त मणिपूरवर चर्चा हवी आहे तर सत्ताधारी पक्षाला पश्चिम बंगाल आणि राजस्थानवरही चर्चा हवी आहे. दुसरी बाब म्हणजे विरोधकांची मागणी आहे की पंतप्रधानांनी मणिपूर हिंसाचारावर भाष्य करावं. तर गृहमंत्री अमित शाह निवेदन देतील असं सरकारचं म्हणणं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे संसदेत चर्चेसाठी कोणतीही मुदत असू नये, अशी विरोधकांची मागणी आहे. तर सरकार सभागृहात 150 मिनिटांच्या चर्चेसाठी तयार आहे. चौथा मुद्दा असा की विरोधक चर्चेनंतर मतदानाची मागणी करत आहे. तर सरकार चर्चेनंतर मतदान करण्यास तयार नाही.

संसदेत चर्चेवरुन कामकाज ठप्प

दुसरीकडे, मणिपूरमध्ये 80 दिवसांहून अधिक काळ हिंसाचार सुरु आहे. मणिपूरच्या अनेक भागात अजूनही तुरळक हिंसाचार सुरु आहे. त्याकडे कोणाचं लक्ष नाही. देशातील अनेक राज्यांमध्ये पुरामुळे हाहाकार माजला आहे. लोकांची काळजी घेणारं कोणी नाही. तर संसदेत चर्चेवरुन गदारोळ सुरु असून कामकाज ठप्प आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar on Manmohan Singh : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
Budget 2025 : प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
Manmohan Singh : नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 | सिटी 60 शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 27 December 2024 ABP MajhaSanjay Raut News : गृहमंत्री दुबळे, कमजोर..बीड हत्या प्रकरणावरुन संजय राऊत यांनी फडणवीसांना सुनावलंSandeep Kshirsagar On Beed Sarpanch Death : हत्येचा मूळ सूत्रधार वाल्मिक कराड का सरेंडर होत नाही? धनंजय मुंडेंमुळे..Chandrashekhar Bawankule On Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या जाण्याने देशाचं नुकसान- चंद्रशेखर बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar on Manmohan Singh : स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष देशाची सेवा करण्यासाठी मनमोहन सिंग यांनी योगदान दिलं; शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
Budget 2025 : प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
प्राप्तिकर दात्यांना दिलासा मिळणार? सरकार कर दरात कपात करण्याची शक्यता, अर्थसंकल्पात मोठा निर्णय?
Manmohan Singh : नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
नरसिंह राव म्हणाले होते, यशस्वी झालो तर श्रेय आम्हा दोघांना, अपयशी ठरलो तर तुम्ही जबाबदार!
Beed Crime: बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी,  संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांच्या कारवाईला वेग
बीड जिल्ह्यातील बंदुकीची सर्व लायसन्स रद्द करण्याची मागणी; पोलिसांच्या कारवाईला वेग
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
बसायला करोडोची गाडी, टॉपच्या सुविधा, पण मारुती 800 कडे पाहात राहायचे, मनमोहन सिंग यांची अशी गोष्ट जिचा अख्ख्या देशाला अभिमान वाटेल!
Teachers Salary: लाडकी बहीण योजनेमुळं तिजोरीवर भार? शिक्षकांचा पगार लांबणीवर? दोन ते तीन दिवस प्रतीक्षा करावी लागणार  
 मोठी बातमी, नववर्षात शिक्षकांचा पगार लांबणीवर? दोन ते तीन दिवस उशिरानं वेतन मिळणार, नेमकं कारण काय? 
Pune Rain Update: पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; शहरात दोन दिवस वादळी पावसाची शक्यता, चार जिल्ह्यांना ऑरेंज, तर 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट
IPO Listing : भारतीय शेअर बाजारात सहा कंपन्यांचे आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदारांची दिवाळी, सर्वाधिक रिटर्न कुणी दिले?
शेअर बाजारात सहा आयपीओ लिस्ट, गुंतवणूकदार मालामाल, सर्वाधिक परतावा कुणी दिला?
Embed widget