एक्स्प्लोर
भुजबळांच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये मोर्चा, ओबीसींच्या मोर्चेबांधणीचा प्रयत्न

नाशिक : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या छगन भुजबळांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने भुजबळ समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
संपूर्ण ओबीसी समाज एकत्र करण्याचा प्रयत्न आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे. त्यासाठी जय्यत तयारीही करण्यात आली आहे. जागोजागी भुजबळांचे बॅनर्स, समर्थनाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.
या मोर्चादरम्यान एक गोष्ट समोर येताना दिसतेय, ती म्हणजे एकेकाळी स्वतःला भुजबळांचे समर्थक म्हणवून घेणारे राष्ट्रावादीतले काही चेहरे तयारी कामात कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे आजच्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळांच्या समर्थनार्थ उतरते की आताही भुजबळांना एकटीच पाडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज






















