एक्स्प्लोर

Weather Update : परतीच्या पावसाचा धुमाकूळ! राज्यात पुढील 48 तास मुसळधार पाऊस! कोल्हापूरला ऑरेंज, तर पुण्यात येलो अलर्ट

Maharashtra Monsoon Update : हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार, येत्या 48 तासांत महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather Update : राज्यासह देशात गेले काही दिवस पावसाची हजेरी (Monsoon Update) पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास (Return Monsoon) सुरु झाला असला तरी, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. आजही महाराष्ट्रात जोरदार पाऊस (Maharashtra Weather Update) पडण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवला आहे. काही भागात अतिवृष्टी तर काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. 

राज्यात पुढील 48 तास मुसळधार पाऊस

गणेशोत्सवापासून राज्यात पावसाची रिमझिम कायम आहे. गेल्या आठवडाभरात महाराष्ट्रात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं आहे. कोकण किनारपट्टीसह गोवा, तामिळनाडू केरळ राज्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार, येत्या 48 तासांत महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने कोल्हापूरसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील निवडक जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज मुंबईत ढगाळ वातावरण

भारतीय हवामान विभाग (IMD) ने अंदाज वर्तवला आहे की मुंबई आणि आसपासच्या परिसरात आठवड्यात पाऊस विश्रांती घेईल. या आठवड्यात मुंबई शहरासह उपनगरात ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत. मुंबईत येत्या काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता आहे.  या वर्षी मान्सूनचे आगमन होऊनही मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत जून ते सप्टेंबर दरम्यान 13 टक्के जास्त पाऊस झाला आहे.

पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून माघार घेणार

नैऋत्य मान्सूनने 3 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तर भारतातील बहुतांश भागांतून माघार घेतली आहे. उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि गुजरातमधील उर्वरित भागांमधूनही मान्सून माघारी परतला आहे. जम्मू-काश्मीर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश, उर्वरित गुजरात, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून पुढील दोन-तीन दिवसांत नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Embed widget