एक्स्प्लोर
आमदार प्रशांत परिचारक यांची प्रचार सभेत जीभ घसरली

उस्मानाबाद: विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची बौद्धिक दिवाळखोरी समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील भोसेमधल्या भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना, त्यांनी राजकारणाची व्याख्या करताना देशाच्या जवानांचा अपमान केला आहे.
प्रशांत परिचारक हे भाजपचे सहयोगी आमदार असून, नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची फुटलेली मतं मिळवून ते सोलापूरमधून विधान परिषदेवर निवडून गेले.
भोसेमध्ये उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत विरोधकांवर टीका करण्याच्या नादात त्यांनी सिमेवर लढणाऱ्या जवानांचा घोर अपमान केला आहे. सत्तेच्या मस्तीत आपण काय बोलतोय याचे भान जिल्ह्याच्या आमदाराला नसावे, याबद्दल लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
परिचारक म्हणाले की, ''पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सिमेवर लढत असतो. आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो.'' परिचारक यांच्या या वक्तव्यावर नागरिकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
भाषणाचा व्हिडिओ पाहा
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement
























