एक्स्प्लोर
पंकजाताईमुळे मी राज्यमंत्र्याचा कॅबिनेट मंत्री झालो: राम शिंदे
भगवानगड (अहमदनगर): महंत नामदेवशास्त्री आणि त्यांच्या समर्थकांचा विरोध झुगारुन आज पंकजा मुंडे आपल्या लाखो कार्यकर्त्यांसह भगवानगडावर पोहोचल्या. यावेळी पंकजा मुंडेंसह कॅबिनेट मंत्री महादेव जानकर, राम शिंदे आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते. यावेळी भगवानगडाच्या पायथ्याशी राम शिंदे यांनीही भाषण केलं.
यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, 'संघर्ष यात्रेनंतर राज्यात परिवर्तन झालं. ताई संघर्ष ही आपली परंपरा आहे. ती आपल्याला कायम ठेवायची आहे. ताई मी तुमच्यामुळे राज्यमंत्र्याचा कॅबिनेट मंत्री झालो. कॅबिनेट पदाचा कारभार स्वीकारण्याआधी मी ताईंची भेट घेतली. त्यानंतरच मी पदभार स्वीकारला.' असं म्हणत राम शिंदे यांनी कॅबिनेट मंत्री झाल्याचं श्रेय पंकजा मुंडेंना दिलं.
'दसरा मेळावा ही भगवानगडाची प्रतिष्ठा आहे. भगवानबाबा आमचे दैवत आहेत.' असंही राम शिंदे म्हणाले.
दरम्यान, यावेळी पंकजा यांचे पती अमित पालवे, राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि रासप नेते महादेव जानकर, पणनराज्यमंत्री सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासह दिग्गज नेत्यांची हजेरी होती.
पंकजा यांना रॅलीतून भगवानगडावर पोहोचायला जवळपास पाऊण ते एक तास लागला. वाटेत पंकजा समर्थकांनी पंकजांच्या नावाच्या घोषणाही दिल्या. त्यामुळं संपूर्ण भगवानगड आज पंकजामय झाल्याचं वातावरण दिसत होतं.
दरम्यान आक्रमक झालेल्या समर्थकांना पंकजा मुंडे यांनी शांतता आणि संयम बाळगण्याचं आवाहन केलं. भगवानबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर पंकजा यांनी महंत नामदेवशास्त्री यांची भेट मात्र टाळली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement