(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Puntamba Protest : शेतकरी प्रश्नांवर कृषीमंत्र्यांची पुणतांबा कोअर कमिटीच्या सदस्यांबरोबर बंद दाराआड चर्चा
गेल्या तासभराहून अधिक वेळ झालं पुणतांब्यातील आंदोलक शेतकरी आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु आहे. त्यामुळं आज आंदोलनावर तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Puntamba Farmer Protest : गेल्या चार दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात पुणतांबा याठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. आज खुद्द राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. गेल्या तासभराहून अधिक वेळ झालं बंद दाराआड दादाजी भुसे आणि आंदोलक यांच्यात चर्चा सुरु आहे. त्यामुळं आज आंदोलनावर तोडगा निघणार का? मंत्री दादाजी भुसे आंदोलकांना काय आश्वासन देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, कृषीमंत्री दादा भुसे यांची शेतकरी नेत्यांशी बंद दाराआड चर्चा सुरु आहे. या चर्चेला किसान क्रांती संघटनेचे नेते तसेच कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित आहेत. कृषीमंत्री दादाजी भुसे यांची प्रसारमाध्यमांसमोर चर्चा करण्याची तयारी असताना कोअर कमिटीनं मात्र प्रसारमाध्यमांसमोर चर्चा करण्यास नकार दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सध्या बंद दाराआड चर्चा सुरु आहे, आता यातून काय मार्ग निघणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कृषीमंत्र्याबरोबर चर्चेसाठी कोअर कमिटीचे कोणकोणते सदस्य आहेत
डॉ.धनंजय धनवटे
धनंजय जाधव
बाळासाहेब चव्हाण
सुहास वहाडणे
सुभाष कुलकर्णी
सुभाष वहाडणे
निकीता जाधव
अमोल सराळकर
सर्जेराव जाधव
चंद्रकांत डोखे
गणेश बनकर
नामदेव धनवटे
मुरलीधर थोरात
दत्तात्रय धनवटे
या सदस्यांबरोबर दादाजी भुसे यांची चर्चा सुरु आहे. हे सर्व सदस्य पुणतांबा गावचे आहेत. यासह विविध विभागाचे शासकीय अधिकारी सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांची देखील बैठकीला उपस्थिती आहे.
1 जूनपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. ऊस, कांदा, पीक कर्द, हमाभीव यासह विविध प्रश्नांवरुन शेतकरी आक्रमक झाले आहेत. पुणतांबा गावातील आंदोलक शेतकऱ्यांना पहिल्याचं दिवशी 149 अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. कोरोनाचं समूळ उच्चाटन न झाल्याचं कारण देत ही नोटीस बजावली. राज्यात सगळीकडे सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय मेळावे, मोर्चा, सभा सुसाट सुरु असताना ही नोटीस दिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.