कार्तिकी एकादशीच्या महापूजेमध्ये उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्हा परिषदेच्या दोन विद्यार्थ्यांचांही समावेश करा, मंत्री दादा भुसेंची मागणी
कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्हा परिषदेच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश करण्याची मागणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली.
Solapur : कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी दांपत्य सहभागी होत असते. यावर्षीपासून या महापूजेमध्ये जिल्हा परिषदेचा एक विद्यार्थी व एक विद्यार्थिनीचा समावेश करण्याची मागणी राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. याबाबत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, याबाबतचा निर्णय घेण्याचा मूळ अधिकार शासनाकडेच असणार आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती हे विधी व न्याय विभाग अंतर्गत काम करते
विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे विधी व न्याय विभाग अंतर्गत काम करते. शिक्षण मंत्र्यांनी आणि परिवहन मंत्र्यांनी केलेली ही मागणी नवीन परंपरा म्हणून सुरू होऊ शकणार असून यावर वारकरी सांप्रदाय भूमिका सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. यापूर्वी 1997 मध्ये तात्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेमध्ये वारकरी प्रतिनिधी म्हणून दर्शन रांगेतील पहिल्या वारकरी दांपत्याचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केलेली ही मागणी शासन स्तरावर आणि मंदिर समितीकडे निर्णयसाठी जाणार आहे.
शिंदे गटाच्या या मागणीमुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
वास्तविक विठ्ठलाचा गाभारा अतिशय लहान असल्याने या येथे खूप मर्यादित लोकांना उभे राहता येते. गाभाऱ्यात गर्दी होऊ लागल्याने पूजेला आलेल्या व्हीआयपींना सफोकेशनचा त्रास झाला होता. आता शिंदे गटाच्या या मागणीमुळं नवा वाद निर्माण होऊ शकतो. यातून जिल्हा परिषदेच्या सर्वसामान्य विद्यार्थी महापूजेत सहभागी झाल्यावर महापूजेत सहभागी झाल्यावर एक चांगला मेसेज राज्यभर जाईल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न होणार
आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची महापूजा (Kartiki Ekadashi) उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा विठ्ठल मंदिरात आहे. मात्र राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकीची पूजा शिवसेनेचे एकनाथ शिंदे की राष्ट्रवादीचे अजित पवार? यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:























