एक्स्प्लोर
शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता नाही: चंद्रकांत पाटील
कोल्हापूर: 'मुंबईत भाजपचाच महापौर असेल, 115 जागा भाजप जिंकणारच. सरकारला युती तुटल्याचा धोका नाही आणि शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता नाही.' असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं.
'भाजप-शिवसेना हे नैसर्गिक मित्रपक्ष असून निवडणुकीनंतरही हे पक्ष एकत्र येतील. आरोप-प्रत्यारोप हे होतच राहणार.' असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.
'शिवसेना-मनसेची युतीची चर्चा हा राजकारणाचाच एक भाग आहे. मुंबई महापालिका सोडून इतर ठिकाणी युतीसाठी उद्धव ठाकरे पुन्हा निर्णय घेतील.' असा विश्वासही चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भाजपसोबत येण्यास नकार दिल्यानं चंद्रकांत पाटलांना मोठा धक्का समजला जातो आहे. याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, 'स्वाभिमानी सोबत न आल्याचे दुःख झालं आहे.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement