एक्स्प्लोर
फळ-भाज्या नियंत्रण मुक्तीविरोधात बाजार समित्या बंद, व्यापार ठप्प, शेतकरी हैराण

मुंबई : नाशिकमध्ये व्यापाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलेला असताना, आता नवी मुंबई बाजार समितीही मंगळवारपासून बंद ठेवू, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
नाशिकमध्ये व्यापाऱ्यांच्या बेमुदत बंदमुळे बाजार समित्यांमधला व्यवहार ठप्प पडला आहे. भाजीपाला बाजार समितीतून नियंत्रण मुक्त करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे. त्याचबरोबर आडत
व्यापाऱ्यांकडून वसूल केली जावी, या निर्णयाविरोधात व्यापारी नाराज आहेत. ज्याचा परिणाम बाजारपेठेतील व्यव्हारांवर होताना पहायला मिळाला.
स्थानिक शेतकऱ्यांना तात्पुरती शेड उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिथे शेतकरी आपला भाजीपाला विकताना दिसत आहेत. नाशिकसह, मनमाड आणि इतर अनेक ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये बंद पाळण्यात येतो आहे.
अहमदनगर जिल्ह्यात 14 मार्केट यार्डमधील कांदा मार्केट दुपारपासून बंद आहेत. तर अकोला, पारनेर, राहता आणि श्रीगोंदा मार्केट शनिवारच्या सुट्टीमुळे बंद आहे, तर पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहता मार्केटला व्यापाऱ्यांचा बंद आहे, पण कर्जत आणि जामखेडला मार्केट सुरु असून, बंदसंदर्भात व्यापाऱ्यांची बैठक सुरु आहे.
कुठे कुठे मार्केट बंद:
- मनमाड - आजपासून मार्केट बंद
- नाशिक - आजपासून मार्केट बंद
- अहमदनगर - आजपासून बंद
- नवी मुंबई – मंगळवारपासून बंद
- नंदूरबार – मंगळवारपासून बंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
