Maratha Reservation Protest LIVE : परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार, समन्वयकांसोबतच्या बैठकीत संभाजीराजेंची माहिती
Maratha Reservation Silent Protest : आजपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापुरातून मूक आंदोलनाची सुरुवात होणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhaji Raje Chhatrapati) यांची नेतृत्त्वात आज हे आंदोलन पार पडणार आहे. या आंदोलनात प्रकाश आंबेडकर, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटीलही सहभागी होणार आहेत.
LIVE

Background
सिंधुदुर्ग : तेरेखोल नदीला पूर आल्याने बांदा बाजारपेठेत पाणी
तेरेखोल नदीला पूर आल्याने बांदा बाजारपेठेत पाणी. होडावडे पुलावरून पाणी वाहत असल्याने वेंगुर्ले बेळगाव राज्य महामार्गावरील वाहतूक बंद. जिल्ह्यातील प्रमुख नद्याना पुरसदृश्य स्थिती. जिल्ह्यात आतापर्यंत ६३० मी. मी. पाऊस
परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार, समन्वयकांसोबतच्या बैठकीत संभाजीराजेंची माहिती
मूक मोर्चातील सत्ताधाऱ्यांच्या भाषणावर मराठा क्रांती मोर्चा नाराज, मागण्या मान्य केल्याचं पत्र मिळण्याऐवजी केवळ भाषणबाजी झाल्याचं मत
आजच्या मूक मोर्चातील सत्ताधाऱ्यांच्या भाषणाबाबत मराठा क्रांती मोर्चा नाराज असल्याचं समजतं. मागण्या मान्य केल्याबाबतचं पत्र मिळण्याऐवजी केवळ भाषणबाजी ऐकायला मिळाली, असं मराठा क्रांती मोर्चाचं म्हणणं आहे. तसंच पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढण्यावर मराठा क्रांती मोर्चा ठाम आहे.
हा आवाज मुंबईपर्यंत पोहचलाय, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे : श्रीमंत शाहू महाराज छत्रपती
श्रीमंत शाहू महाराज छत्रपती बोलताना म्हणाले की, "मराठा आरक्षणाचा मुद्दा एकमतानं हाताळण्यापेक्षा दुफळी करण्याकडे अनेकांचा प्रयत्न होता. हा आवाज मुंबईपर्यंत पोहचला आहे, आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीमध्ये राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल, नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. मराठा समाज कोणकोणत्या ठिकाणी मागास आहे, हे पाहिलं पाहिजे, केवळ याचिका दाखल करून उपयोग नाही. यासाठी सर्व खासदार, आमदार, समाज यांनी एकत्र यावं."
वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
"मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी दोन वेळा आंदोलन केलं. पण आरक्षण कोर्टात टिकलं नाही. नारायण राणे यांची समिती नेमून आरक्षण देणं ही आमची चूक होती. ", असं हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले. कायदा व्यवस्थित असता तर तो टिकला असता ना, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी भापवर निशाणाही साधला. तसेच सारथी, नियुक्ती पत्र असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कर्ज देणं असेल हे सगळे प्रश्न आम्ही पूर्ण करणार, वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू, अशी ग्वाहीही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बोलताना दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
