एक्स्प्लोर
मराठा समाजाचा सोलापुरात ऐतिहासिक मोर्चा, शिस्तीचं अनोखं दर्शन

सोलापूरः शांतता, संयम, माणसुकीचे, एकतेचे, एकजुटीचे दर्शन घडवत कोपर्डीच्या बलात्कार प्रकरणातील घटनेचा निषेध नोंदवत मराठा समाजाचा मूक मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसाठी सोलापुरात आज पुणा नाका येथील संभाजी चौकापासून जिजाऊ वंदना करून मूकमोर्चास प्रारंभ करण्यात आला. संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा शिवाजी चौकाकडे मार्गस्थ झाला. या मोर्चात मोहोळ, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, माळशिरस, दक्षिण सोलापूर, करमाळा, सांगोला, माढा आदी तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठया संख्येने सहभागी झाला होता.
PHOTO: सोलापुरात भव्य मराठा मोर्चा
या मोर्चात इतर समाज बांधवांचाही सहभाग लक्षणीय होता. भव्य गर्दी असताना देखील शिस्त, स्फूर्ती आणि काटेकोर नियोजन या मोर्चाचं वैशिष्ट्य होतं.आणखी वाचा























