एक्स्प्लोर
निवेदन देण्यासाठी पाचोऱ्यात मराठा मोर्चाने पवारांचा ताफा अडवला
निवेदन देण्यासाठी काही जण रस्त्यावर येताच पवारांनी गाडी थांबविण्यास सांगितलं. निवदेन स्वीकारलं आणि ताफा पुढे निघून गेला.
जळगाव : मराठा क्रांती मोर्चाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा अडवून मराठा आरक्षणाबाबतचं निवेदन देण्यात आलं. निवेदन देण्यासाठी काही जण रस्त्यावर येताच पवारांनी गाडी थांबविण्यास सांगितलं. निवदेन स्वीकारलं आणि ताफा पुढे निघून गेला.
गाडी थांबवून निवेदन स्वीकारल्याबद्दल निवेदनकर्त्यांनी शरद पवार यांचे आभारही मानले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा, असं या निवेदनात म्हटलं आहे.
काय आहे निवेदन?
''आपणास महाराष्ट्रातील तमाम जनता आदराचं स्थान देते. जेव्हा आपण दिल्लीचा तक्त राखण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा तमाम जनता आणि संपूर्ण मराठा समाज आपल्या पाठीशी उभा होता. आपण आणि आपल्या पक्षाने मराठा समाजावर जो सतत नेहमी अन्याय होत असतो त्या बाजूने उभे राहिले पाहिजे ही सार्थ अपेक्षा. आपण बहुजनांचे नेते आणि छत्रपतींचे वारस असल्यामुळे आपण जरी स्वतः च्या समाजाला झुकते माप देता येत नसले तरी शेतजमीनीवर अवलंबून असलेला समाज आता देशोधडीला लागला आहे. त्यामुळे आरक्षण ही मागणी खूप खूप महत्त्वाची आहे. आपण मध्यंतरीच्या काळात आर्थिक निकषावर आरक्षण लागू करावे असे विधान केले होते. पंरतु आपल्या बोलण्यात जरी सामान्य आणि आर्थिक दुर्बल मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे असा जरी असला तरी यावर पुन्हा कोणी तरी आयोगाचा अध्यक्ष होईल आणि वर्ष ना वर्ष ही मागणी तशीच खितपत पडेल. त्यामुळे जे आरक्षण आपणच दिले ते जैसे थे ठेवून लवकर लागू कसे होईल यासाठी प्रयत्न करा अशी आम्ही विनंती करतो. कारण, तमाम मराठा युवक आपल्याकडे अपेक्षेने बघतो आहे. आपण कोणतेही स्टेटमेंट केले तरी मराठा युवक खुप विचार करतो. आपणास जाणता राजाच्या भूमिकेत मराठा युवक बघतो,'' असं निवेदनाच्या शेवटी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement