एक्स्प्लोर

दोन रुपयांच्या कुत्ता गोलीच्या नशेत मालेगावची तरुणाई धुंद

मालेगाव शहर हे यंत्रमागाचं शहर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आणि कामगार राहतात. अगदी कमी पैशात जास्तीची नशा होईल असा फंडा मालेगाव शहरात रुजला.

मनमाड : कुत्ता गोलीच्या नशेत मालेगावची तरुणाई धुंद झाली आहे. अवघ्या दोन रुपयांत मिळणारी ही नशा क्षणात शरीरात भिनते. त्यामुळे 'कुत्ता गोली' या नावाची सध्या मालेगावमध्ये जोरदार चर्चा आहे. अठरा ते वीस वर्ष वयोगटातील बहुतांश तरुणाई या नशेच्या आहारी गेली आहे. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीही गोळीचं सेवन करुन गुन्हा करताना आढळले आहेत. मालेगाव शहर हे यंत्रमागाचं शहर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आणि कामगार राहतात. अगदी कमी पैशात जास्तीची नशा होईल असा फंडा मालेगाव शहरात रुजला. नजीम मोहम्मद ऊर्फ भवानी.. एकदा मित्रांसोबत त्याने कुत्ता गोळीची नशा केली. मात्र कधी तो व्यसनाधीन झाला त्याला कळलंच नाही. पण व्यसनाच्या अंधारमय जगातून त्याला स्थानिक पोलिसांनी सुरु केलेल्या सल्ला केंद्राने बाहेर काढलं. काय आहे कुत्ता गोली? या गोळीचं नाव अल्प्रलोजोम आहे. काही उत्तेजक पदार्थांपासून गोळीची निर्मिती होते. गोळीच्या अतिसेवनाने शरीर बधीर होतं. याशिवाय मानसिक संतुलनही बिघडण्याची शक्यता आहे. मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या या गोळ्यांच्या सेवनाने नशेखोर व्यक्ती आपल्याच धुंदीत राहतो. त्यामुळे त्यांचं आयुष्य वाया जाण्याचा धोका निर्माण होतो. या गोळीत उत्तेजक पदार्थ असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्रीसाठी मनाई आहे. मात्र काही मेडिकल स्टोअर्स या गोळ्या सर्रासपणे विकतात. गेल्या सहा महिन्यांपासून या गोळीची माहिती अनेकांना झाली आणि तिच्या विक्रीतही सहजासहजी उपलब्ध होऊ न शकणारी कुत्ता गोळी अनेक ठिकाणी छुप्या रितीने या गोळ्यांची पाकिटे मिळू लागल्यानंतर पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत या गोळ्या बाहेर विकणाऱ्यांवर कारवाई केली. कारवाईत आतापर्यंत सहा हजार गोळ्या जप्त करुन दहा जणांवर काही दिवसांपूर्वी कारवाई केली. त्यात काही गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले. तर 15 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत शहरात सर्च ऑपरेशन राबवून कुत्ता गोळी आणि नशेखोरांचा पोलिस शोध घेत आहेत. त्यामुळे तरुणाईच्या प्रबोधनाबरोबरच मेडिकल्सवरही मोठ्या कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra HSC Exam : राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
राज्यातील 18 हजार 534 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात, UDISE नोंदणीअभावी बारावीचा परीक्षा अर्ज भरता येईना; शिक्षण विभागाचा ढिसाळ कारभार
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त

Embed widget