एक्स्प्लोर
ठाण्यात एकाचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटमध्ये नगरसेवकाचं नाव
ठाणे : राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका 50 वर्षीय व्यक्तीने सुसाईड नोटमध्ये नजीब मुल्ला यांना जबाबदार धरलं आहे.
ठाण्याच्या राबोडीतील रहिवासी अब्दुल काझी यांनी शनिवारी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःला पेटवण्यापूर्वी वेळीच मित्राने त्यांच्या हातातील मशाल खेचून घेतल्याने ते बचावले. हा प्रकार करण्यापूर्वी काझी यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये नगरसेवक नजीब मुल्ला यांना जबाबदार धरलं आहे.
काझी यांच्या मालकीची राबोडीत 14 खोल्यांची चाळ आहे. नजीब मुल्ला ही जागा विकसित करण्यासाठी त्यांनी पाठवलेल्या बिल्डरशी करार करण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप काझी यांनी केला आहे.
नजीब मुल्ला यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. विशेष म्हणजे नगरसेवक मुल्ला हे यापूर्वी ठाण्यातील बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणातही अटकेत होते. सध्या ते जामीनावर आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement