(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Majha Maharashtra Majha Vision 2024 : आता गॅरंटी या शब्दाचा अपमान होतोय, नाना पटोलेंचा भाजपला टोला
Majha Maharashtra Majha Vision 2024 LIVE Updates : मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध पक्षाच्या बड्या नेत्यांचं महाराष्ट्रापती व्हिजन काय, हे तुम्ही आज दिवसभर पाहू शकाल.
LIVE
Background
Majha Maharashtra Majha Vision 2024 : निवडणुकीआधी चर्चा महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या विकासाची आणि नेत्यांच्या व्हिजनची.. एबीपी माझावर आज दिवसभर पाहा माझा महाराष्ट्र माझं व्हिजन. मुख्यमंत्र्यांसह राज्यातील विविध पक्षाच्या बड्या नेत्यांचं महाराष्ट्रापती व्हिजन काय, हे तुम्ही आज दिवसभर पाहू शकाल.
Majha Maharashtra Majha Vision : महिला आरक्षणावर मोदी खोटं बोलतात, नाना पटोलेंचा आरोप
एकीकडे महिला बील आणलं, महिला आरक्षणाचं विधेयक आणलं आणि ते 2029 रोजी लागू केलं जाणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हे आरक्षण जनगणनेच्या आधारे आणण्यात येईल असं ते म्हणाले. पण त्यासाठी जनगणना तरी झाली पाहिजे. देशात जनगणनाच झाली नसल्याने ते देशाला फसवण्याचं काम करत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
Majha Maharashtra Majha Vision : आता भाजप नव्हे तर मोदी सरकार, गॅरंटी या शब्दाचाही अपमान होतोय, नाना पटोलेंचा टोला
सध्याचं सरकार हे भाजप पक्षाचं नाही तर मोदी या एका व्यक्तीचं आहे, त्यामुळेच त्याला मोदी सरकार म्हटलं जातंय. त्यामुळेच आता गॅरंटी या शब्दाचा अपमान होतोय असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.
Majha Maharashtra Majha Vision 2024 : महाराष्ट्र कसा चालेल ही नोट दिल्लीकडून येते: आदित्य ठाकरे
महाराष्ट्र कसा चालेल ही नोट दिल्लीकडून येते. महाराष्ट्र गुजरातसाठी चालतोय, सगळं उलटं सुरु आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवले जात आहेत.हे सगळं इगो इश्यू म्हणून पाठवले जात आहेत
महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय परिस्थिती बिघड़ली आहे. राजकीय परिस्थितीचा चोथा झाला असून शिवसेना राष्ट्रवादी फोडली. घटनाबाह्य सरकारने 30 शहरात कब्जा केला.
Majha Maharashtra Majha Vision 2024 : गद्दारांच्या सरकारमध्ये राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडली : आदित्य ठाकरे
जेव्हा आमदार गोळीबार करायला लागतो, माजी नगरसेवकावर गोळीबार होतो, बिल्डिंगच्या व्हॉट्सअॅपवर वाद होऊन त्यावर भांडण होतं, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. महाविकास आघाडीच्या काळात राज्यात शांतता होती, तेच व्हिजन घेऊन आम्ही पुढे जाऊ असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.