एक्स्प्लोर

विधानपरिषद निवडणुकीसाठी बिगुल वाजलं; लोकसभा निकाल लागताच महाराष्ट्रात पुन्हा रणधुमाळी

Teachers and Graduates Election:  मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालीय. चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपतोय.  

Teachers and Graduates Election: राज्यात लोकसभेची (Lok Sabha Election) रणधुमाळी संपते न संपते तोच विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad)  चार जागांवर निवडणूक होत आहे.  पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. मुंबई, नाशिक आणि कोकण विभागाचं 10 जूनला मतदान होतंय. मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालीय. चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपतोय.  

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे.  विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी 7 सदस्य शिक्षक, तर 7 सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात. दरम्यान दोन पदवीधर आणि  दोन शिक्षक मतदार संघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या कार्यक्रमानुसार 10 जूनला मतदान होणार असून  13जूनला मतमोजणी होईल. 

कशी असणार निवडणूक प्रक्रिया?

निवडणुकीची प्रक्रिया 15 मे पासून सुरू होणर आहे. इच्छुक उमेदवारांनी 22 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. इच्छुकांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी 24 मे रोजी होणार तर आहे. अर्ज मागे घ्यायचा असेल 27 मे पर्यंत उमेदवारांना अर्ज मगे घेता येणार आहे.

कोणत्या  चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार?

  1. विलास विनायक पोतनीस - मुंबई पदवीधर (ठाकरे गट)
  2. निरंजन वसंत डावखरे - कोकण पदवीधर (भाजप)
  3. किशोर भिकाजी दराडे - नाशिक शिक्षक  (ठाकरे गट)
  4. कपिल हरिश्चंद्र पाटील - मुंबई शिक्षक (लोकभारती

पदवीधर मतदार संघातील उमदेवाराला नोंदणी आवश्यक असते. मतदार संघात हजर राहून मतदान करावे लागते. . निवडणूक जाहीर होण्याच्या तीन वर्षाआधी मतदाराने आपला पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 

कशी पार पडते निवडणूक प्रक्रिया?

विधानपरिषद निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा आहे. राज्यसभेत खुले मतदान असल्याने पक्षाच्या आमदारांना मत दाखवून टाकावे लागते. पण विधान परिषद आमदार गुप्त मतदान करतात त्यामुळेच विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता असते. निवडणुकीसाठी जितके मतदार उभे असतील तेवढ्या उमेदवार ना पसंती क्रम देता येतो. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. विधान परिषद स्थायी सभागृह आहे. ते कधीही विसर्जित होत नाही. दर दोन वर्षांनी सभागृहाचे एकास तीन सदस्य निवृत्त होतात तेवढेच नव्याने निवडतात. 

हे ही वाचा :

राहुल गांधींनी खरंच अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली? लोकांनी खरंच मोदी-मोदी म्हणत घोषणाबाजी केली? वाचा सत्य काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Embed widget