राहुल गांधींनी खरंच अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली? लोकांनी खरंच मोदी-मोदी म्हणत घोषणाबाजी केली? वाचा सत्य काय?
राहुल गांधी यांनी अयोध्येत जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेतल्याचा दावा केला जातोय. पण हे खरं आहे का? या दाव्यात किती सत्य आहे? असा प्रश्न विचारला जातोय.
मुंबई : या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) काँग्रेस, इंडिया आघाडीचा (INDIA Alliance) विजय व्हावा म्हणून काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे मोठ्या ताकदीने प्रचार करत आहेत. वेगवेगळ्या लोकांशी ते संवाद साधत आहेत. ते रायबरेली या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, सध्या त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला जात असून उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथील राम मंदिराचे दर्शन घेतल्याचा दावा केला जातोय. तसेच राहुल गांधी हे मंदिरात जाऊन दर्शन घेत असताना मोदी-मोदी असे नारे दिले जातायत, असाही दावा हा व्हिडीओ शेअर करून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर राहुल गंधी यांनी खरंच अयोध्येतील राम मंदिराचं दर्शन घेतलं आहे का? हे जाणून घेऊ या...
नेमका काय दावा करण्यात येतोय?
समाजमाध्यमांवर सध्या राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला जातोय. राहुल गांधी हे उमेदवारी अर्ज दाखल करून आल्यानंतर अयोध्येत राम मंदिराचं दर्शन घ्यायला गेले होते, असा दावा या व्हिडीओच्या मदतीन केला जात आहे. महावीर जैन नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर करून 'उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी पुन्हा एकदा ब्राह्मण झाले असून ते अयोध्येत गेले आहेत. मात्र लोकांनी जय श्री राम , मोदी- मोदी असे नारे देत राहुल गांधी यांचे खास स्वागत केले,' असे खोचक कॅप्शन दिले होते. ही पोस्ट आतापर्यंत 20 हजारपेक्षाही अधिक लोकांनी पाहिली आहे.
सत्य नेमकं काय?
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी हे अयोध्येत गेल्याचा दावा केला जातोय. मात्र सध्या व्हायरल केला जात असलेला हा व्हिडीओ अयोध्येतील नाही. हा व्हिडीओ फेब्रुवारी महिन्यातील आहे. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी हे झारखंडच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बाब वैद्यनाथ धाम मंदिराला भेट दिली होती. याच देवदर्शनावेळी लोकांनी राहुल गांधी यांच्यापुढे मोदी-मोदी, जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या.
जुना व्हिडीओ केला जातोय शेअर
गुगल लेन्स सर्चच्या मदतीने हा व्हिडीओ 3 फेब्रुवारी रोजी समाजमाध्यमांवर अपलोड करण्यात आला होता. भाजपचे नेते डॉ. निषिकांत दुबे यांनी त्यांच्या एक्स खात्यावर हा व्हिडीओ शेअर केला होता. 'मुस्लिमांच्या तुष्टीकरण करून राजकारण करणाऱ्यांविरोधात माझा गोड्डा हा लोकसभा मतदारसंघ उभा आहे. माझा हा मतदारसंघ मोदीमय आहे. येथे मोदी यांचा सन्मान केला जातो,' असे निषिकांत म्हणाले होते. एएनआय या वृत्त संस्थेच्या यूट्यूब चॅनेलवरदेखील हा व्हिडीओ 3 फेब्रुवारी रोजी शेअर करण्यात आला होता.
हा जुना व्हिडीओ नव्याने शेअर केला जातोय :
मुस्लिम तुष्टिकरण की राजनीति के खिलाफ मेरा गोड्डा लोकसभा केवल प्रधानमंत्री मय यानि मोदी मय है। यहाँ भक्त मोदी जी का सम्मान है,आपकी तरह राहुल गांधी जी वोट भक्त का बहिष्कार है अपमान नहीं pic.twitter.com/UBd75Va91i
— Dr Nishikant Dubey(Modi Ka Parivar) (@nishikant_dubey) February 3, 2024
राहुल गांधी अयोध्येला गेलेच नाहीत
म्हणजेच राहुल गांधी यांनी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिल्याचा दावा खोटा आहे. राहुल गांधी यांनी राम मंदिराला अद्याप भेट दिलेली नाही. तसेच त्यांच्याविरोधात अयोध्येत कोणीही घोषणाबाजी केलेली नाही.
हेही वाचा :