(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Politics : शिंदे गट गुवाहाटीला जाण्याच्या तारखेत बदल, 'ही' तारीख जाहीर होणार, मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती
Maharashtra Politics : शिंदे गटातील मंत्री व आमदार 21 तारखेला गुवाहाटीला जाणार असल्याची चर्चा आहे, ते कधी जाणार? याबाबत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी माहिती दिली आहे
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटातील मंत्री व आमदार हे (Guwahati) 21 तारखेला गुवाहाटीला जाणार असल्याची चर्चा आहे, ते कधी जाणार? याबाबत शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी माहिती दिली आहे. काल त्यांनी जळगावात (Jalgaon) एकाच दिवशी 51 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करत विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. काय म्हणाले?
गुवाहाटीला जाण्याची लवकरच नवीन तारीख जाहीर होणार - गुलाबराव पाटील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील मंत्री व आमदार यांची गुवाहाटी 21 तारखेला गुवाहाटी ला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा आहे, मात्र 21 नोव्हेंबर ऐवजी लवकरच नवीन तारीख जाहीर होणार, नवीन तारीख आल्यावर गुवाहाटीला जाण्याबाबत निर्णय होईल असं गुलाबराव पाटील यांनी म्हंटले आहे.
एकाच दिवशी 51 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजण व लोकार्पण
विरोधक सातत्याने शिंदे गटाच्या मंत्र्यांवर विकास होत नसल्याची टीका करीत आहेत. मात्र या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी विकास कामांमधून उत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे. काल एकाच दिवशी गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये तब्बल 51 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजण व लोकार्पण करून विरोधकांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलं आहे. काल सकाळी जळगाव शहरातील दापोरा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोळा पार पडल्यानंतर सायंकाळी चोपडा तालुक्यातील आडगाव येथे विकास कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते
"...त्यामुळे राज्यपालांनी त्यांचा उल्लेख शिवाजी महाराजांप्रमाणे केला असेल"
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी भाजपचे नितीन गडकरी हे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे राज्याचे आदर्श आहेत असे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आदर्श आहेत. नितीन गडकरी हे देशात ज्या पद्धतीने विकास कामे करत आहेत. त्यामुळे राज्यपाल यांनी त्यांचा उल्लेख शिवाजी महाराजांप्रमाणे केला असेल. असं मला वाटतं.. मात्र ही बातमी किती सत्य आहे ते पाहिल्यावरच बोलता येईल असेही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.
"कोणताही अर्थ लावणे योग्य होणार नाही"
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावरून नीलम गोऱ्हे या शिंदे गटात येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर किंवा इतर कामांसाठी त्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली असेल मात्र कोणत्याही गोष्टीला कोणतेही अर्थ लावणे योग्य होणार नाही, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Bharat Jodo : आज 'भारत जोडो'चा महाराष्ट्रातील शेवटचा दिवस, असे असतील कार्यक्रम