Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला जोरदार यश मिळालं आहे. महायुती 220 पर्यंत पोहोचली आहे.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला जोरदार यश मिळालं आहे. बारा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपला 126, शिवसेनाला 56, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 38 जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसला 18, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 19 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 14 जागांवर आघाडीवर आहे. राज्यातील मतदारांनी दिलेला कौल पाहता महायुतीला जोरदार यश मिळालं आहे. महायुतीला 220 जागांवर यश मिळताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी एकूण 50 जागांवर आघाडीवर आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून असं दिसून येतंय की महाराष्ट्राला 2024 ते 2029 या काळात विरोधी पक्षनेता देखील मिळणार नसल्याची चिन्ह आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या 288 आहे. बहुमतानं सरकार स्थापन करणाऱ्या पक्षाला किंवा आघाडीला 144 पेक्षा अधिक जागा आवश्यक आहेत. तर, विरोधी पक्षनेता पद मिळवण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाला विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या म्हणजे 288 जागांच्या एक दशांश आमदार संख्या असणं आवश्यक आहे. 288 च्या एक दशांश म्हणजे 28 पेक्षा आमदार ज्या पक्षाकडे आमदार असतील त्यांचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. महाराष्ट्रतील मतमोजणीच्या अपडेटस पाहता महाविकास आघाडीतील कोणताही पक्ष 28 ची संख्या पार करण्याची शक्यता कमी असल्यानं विरोधी पक्षनेतेपद देखील राज्याच्या विधानसभेत नसणार अशी शक्यता आहे.
मविआला जोरदार फटका
महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळालं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत राज्यात त्याच्या बरोबर उलटं चित्र पाहायला मिळालं आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत 31 जागा मिळाल्या होत्या. तर, महायुतीला 17 जागा मिळाल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत बरोबर उलटं चित्र पाहायला मिळालं आहे. महायुतीला प्रचंड यश मिळालं आहे. महायुती साधारणपणे 220 जागा मिळवत यशस्वी होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे.
2014 आणि 2019 ला लोकसभेत आणि 2024 ला महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार?
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं स्वबळावर सत्ता मिळवली होती. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेली संख्या देखील पार करता आली नव्हती. संसदेत लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी 55 जागांची आवश्यकता असते. 2019 आणि 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला 55 जागा मिळाल्या नव्हत्या. महाराष्ट्रात देखील यावेळी तशीच स्थिती निर्माण होत असल्याचं दिसून येतं आहे. महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाला 28 आमदारांचा टप्पा पार करता येत नसल्याचं चित्र आहे. मविआतील कोणत्याही पक्षाला जर 28 जागा मिळाल्या नाहीत तर पाच वर्ष महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नसणार आहे.
इतर बातम्या :