एक्स्प्लोर

Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्याचा पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार की देवेंद्र फडणवीस, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुती बाजी मारणार, हे स्पष्ट झाल्यानंतर आता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. निवडणुकीच्या आधीपासूनच महायुतीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण, याबाबत चर्चा रंगली होती. मात्र, भाजपसह महायुतीने विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाईल, अशी भूमिका घेतली होती. मात्र, भाजपने 100 जागांचा आकडा ओलांडल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदावरील दावा भक्कम झाला आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत जाहीर चर्चा सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर आता विद्यमान मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांच्या भूमिकेला छेद देणारे वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्रि‍पदाबाबत आमचं काहीच ठरलं नव्हतं, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

महायुतीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील, त्याचा मुख्यमंत्री, असं आमचं काही ठरलं नव्हतं. प्रथम निवडणुकीच्या निकालाचे अंतिम आकडे येऊ दे. मग आम्ही तिन्ही पक्ष ज्याप्रमाणे जागावाटपाच्या चर्चेसाठी बसलो होतो, त्याप्रमाणे एकत्र बसू. पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील. आम्ही जशी निवडणूक लढलो तसा मुख्यमंत्रीपदाबाबतही एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यामुळे ते मुख्यमंत्रि‍पदावरील दावा सहजासहजी सोडणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत. मात्र, भाजपला महाराष्ट्रात अभूतपूर्व यश मिळाल्याने देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि समर्थक पुन्हा एकदा प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्रि‍पदाच्या निवडीवरुन महायुतीमध्ये तिढा निर्माण होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या सध्याच्या कलानुसार महायुती 222 आणि महाविकास आघाडीचे उमेदवार 56 जागांवर आघाडीवर आहेत. महायुतीमध्ये भाजपला 128, शिंदे गटाला 56 आणि अजितदादा गटाला 38 जागांवर विजय मिळू शकतो. तर महाविकास आघाडीत काँग्रेसला 19, ठाकरेंना 19 आणि शरद पवार गटाला अवघ्या 18 जागा मिळू शकतात. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं: प्रवीण दरेकर

विधानसभेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक असलेल्या प्रवीण दरेकर यांनी एक वक्तव्य केले आहे. जी पार्टी मोठी आहे, त्यांचा मुख्यमंत्री होतो. भाजप 125 जागांजवळ गेली आहे, त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं वाटतं, प्रविण दरेकर यांचं महायुतीच्या बाजूनं कल येताच मोठं वक्तव्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
भाजपची राक्षसी महत्त्वाकांक्षा म्हणत 'राज ठाकरेंचा इशारा; चंद्राबाबू नायडूंनाही आवाहन, लोकसभेतील विधेयकावर सविस्तर भाष्य
Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी काँग्रेसनेही पत्ता उघडला, ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसमधून थोरात, हर्षवर्धन सकपाळांसह 6 नावं चर्चेत
विधानपरिषदेसाठी काँग्रेसनेही पत्ता उघडला, ठाकरेंच्या जागेवर काँग्रेसमधून थोरात, हर्षवर्धन सकपाळांसह 6 नावं चर्चेत
NCP Ajit Pawar Group Candidate Vidhan Parishad Election 2026: सिद्धिकी, परांजपे, ठाकूर, जैन, पाटील...; विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून कोणकोण इच्छुक?
सिद्धिकी, परांजपे, ठाकूर, जैन, पाटील...; विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून कोणकोण इच्छुक?
Shivsena UBT Candidate Vidhan Parishad Election 2026 मोठी बातमी: अंधारे, विचारे, दानवे, चव्हाण...शिवसेना ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी 6 नावांची चर्चा; कुणाला मिळणार संधी?
मोठी बातमी: अंधारे, विचारे, दानवे, चव्हाण...ठाकरे गटाकडून विधानपरिषदेसाठी 6 नावांची चर्चा; कुणाला मिळणार संधी?

व्हिडीओ

Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LizLaz on Virat Kohli: किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
Iran War Live Update: ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
Scholarship Exam : राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षण परीक्षा परिषदेच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
Women's reservation Bill Shivsena Priyanka Chaturvedi: प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
प्रियांका चतुर्वेदींनी ठाकरे गटाविरोधात पहिलं पाऊल टाकलं, महिला आरक्षण विधेयकाबाबत पक्षविरोधी भूमिका, स्पष्टच म्हणाल्या...
त्या मादक मॉडेलच्या फोटोवर विराट कोहलीच्या एका लाईकने सोशल मीडियावर गदारोळ, अनेकांनी केलं ट्रोल, नक्की काय घडलं?
त्या मादक मॉडेलच्या फोटोवर विराट कोहलीच्या एका लाईकने सोशल मीडियावर गदारोळ, अनेकांनी केलं ट्रोल, नक्की काय घडलं?
Mumbai Crime News: महिलेने लग्नास दिला नकार, संतापलेल्या होणाऱ्या नवऱ्याने थेट प्रियकराचा काढला काटा; मुंबईतील 'त्या' हादरवणाऱ्या घटनेचा 60 तासांत उलगडा
महिलेने लग्नास दिला नकार, संतापलेल्या होणाऱ्या नवऱ्याने थेट प्रियकराचा काढला काटा; मुंबईतील 'त्या' हादरवणाऱ्या घटनेचा 60 तासांत उलगडा
Akola : संतापजनक! गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत चक्क मेलेलं माकड सापडलं; त्याच टाकीतून गावकऱ्यांना चार दिवस दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
संतापजनक! गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीत चक्क मेलेलं माकड सापडलं; त्याच टाकीतून गावकऱ्यांना चार दिवस दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
Embed widget