(Source: Poll of Polls)
Omicron in Maharashtra : मंगळवारी 75 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद, मुंबईत एका दिवसात 40 नवे रुग्ण
Omicron : देशातील सर्वाधिक 653 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे.
मुंबई : जगभरातच ओमायक्रॉनच्या (Omicron) संकटाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. राज्यातील ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी 75 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात सापडेलल्या रुग्णांपैकी 40 रुग्ण मुंबईतील, 9 रुग्ण ठाणे मनपा, 8 रुग्ण पुणे मनपा, 5 रुग्ण पनवेल, नागपूर आणि कोल्हापुरात प्रत्येकी तीन रुग्ण, पिंपरी-चिंचवडमध्ये दोन तर भिवंडी निजामपूर, उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबईत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनच्या 653 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 259 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई विमानतळावर सापडलेले 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी एक रुग्ण हा पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. सात रुग्ण ठाणे आणि चार रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. तर नऊ रुग्ण विदेशी नागरिक आहेत.
भारतात ओमायक्रॉन संसर्गाची एकूण 1,700 प्रकरणे आढळून आली आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 653 प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यानंतर दिल्लीमध्ये 351 रुग्ण आढळले आहेत. तर केरळात 156, गुजरातमध्ये 136, तामिळनाडूत 121 आणि राजस्थानमध्ये 120 रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यानंतर आता कोविड-19 ची तिसरी लाट देशात दाखल झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :
- ...तरच कोरोनाबाधित असलेली इमारत सील करणार; BMC कडून इमारत सील करण्याबाबत सुधारीत धोरण जाहीर
- ...तर मुंबईत लॉकडाऊन; मुंबई महापालिका आयुक्तांचे संकेत
- Coronavirus In Mumbai: मुंबईतील रुग्णसंख्या वाढली; गेल्या 24 तासात 10 हजार 860 रुग्णांची भर