Attack on Police : बुलढाण्यात आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला, दोन कर्मचारी जखमी
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर हल्ला झाला. याच दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. बुलढाण्यात ही घटना घडली.
बुलढाणा : आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला झाल्याची घटना बुलढाण्यात घडली आहे. या हल्ल्यात पोलीस वाहनाचं मोठं नुकसान करण्यात झालं आहे. तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
लोणार तालुक्यातील बीबी इथल्या इसमाच्या बकऱ्या अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. हे चोरटे बीबी पोलीस स्टेशन हद्दीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांन 13 मे रोजी खापरखेड घुले इथे आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले. यावेळी 14 जणांनी पोलीस पथकावर हल्ला केला.
महिला आणि पुरुषांच्या जमावाने हा हल्ला केला. यानंतर अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ पाचारण करुन ठाणेदार एल डी तावरे यांनी आठ जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सहा आरोपी पसार आहेत.
दरम्यान याआधी संगमनेरमध्येही पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. दिल्ली नाका (तीन बत्ती) परिसरात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करत दगडफेक केली होती. जमावाने पोलिसांना धक्काबुक्की केली तसंच दगडफेकही केली. जमावाने केलेल्या दगडफेकीत काही खासगी वाहनांचेही नुकसान झालं. या प्रकरणी 10 ते 15 जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.