Maharashtra News LIVE Updates : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर...
Maharashtra LIVE Updates : आज दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स एका क्लिकवर...

Background
Maharashtra News LIVE Updates : आज सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे आंतरवली सराटीला उपोषणाला बसणार आहेत. त्याआधी ते गोदापट्ट्यातील आंदोलकांसोबत बैठक घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील चौथ्यांदा उपोषणाला बसणार आहेत. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली असून, माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि मुंबईतील दहिसर भागातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. आज दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या
Beed : मराठा समाजानंतर आता धनगर समाजाचाही आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा
Beed News : मराठा समाजानंतर आता धनगर समाज (Dhangar Community) देखील आरक्षणासाठी (Reservation) आक्रमक झाला आहे. रविवारी बीडमध्ये धनगर समाजाच्या वतीने आरक्षण अंमलबजावणी इशारा मेळावा घेण्यात येणार आहे. बीडमध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुलावर हा मेळावा होणार असून या मेळाव्यातून धनगर आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे
Abhishek Ghosalkar : मुझे फसाया गया है! मॉरिसचा बॉडीगार्ड जोरजोरात ओरडत कोर्टातून बाहेर, अमरेंद्र मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत कोठडी!
Abhishek Ghosalkar Firing News : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मॉरिस नोरोन्हा (Mauris Noronha) या गुंडाने दहिसरमधील एका कार्यक्रमादरम्यान अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यामध्ये अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचा जागीच मृत्यू झाला होता. घोसाळकरांच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापल्याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरु आहे. गुन्हे शाखेने मॉरिस नोरोन्हा याचा अंगरक्षक असलेल्या अमरेंद्र मिश्रा (Amrendra Mishra) याला अटक केली होती. याच अमरेंद्र मिश्राच्या बंदुकीतून अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
























