Virar News: पालघर: विरारमध्ये इमारतीची भिंत कोसळून ३ महिला मजूर ठार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
Virar News: पालघर: विरारमध्ये इमारतीची भिंत कोसळून ३ महिला मजूर ठार
Virar News: पालघर: विरारमध्ये चालू बांधकामाची भिंत कोसळून तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. विरारच्या रेल्वे स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला पुनर्विकास प्रक्रियेतील इमारतीचं काम सुरू होतं. त्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या विरार पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Bhandara News: भंडारा नगर पालिकेच्या डम्पिंग यार्डमधील वीज चोरी पकडली; महावितरणची कारवाई
Bhandara News: भंडारा नगरपालिकेच्या जमनी येथील डम्पिंग यार्डमध्ये चोरीची वीज वापरीत असल्याचं गंभीर प्रकरण समोर आलं. याप्रकरणी भंडारा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज चोरी पकडून 48 तासात दंडाची 45 हजार रुपयांची रक्कम भरण्याचे आदेश बजावले आहे. या कारवाईनं मोठी खळबळ उडाली आहे. भंडारा नगरपालिकेच्या डम्पिंग यार्डमध्ये बांधकाम सुरू असून यासाठी चोरी ची वीज वापरली जात असल्याचं महावितरणच्या अधिकाऱ्यांना लक्षात आल्यानं ती पकडून यासाठी वापरण्यात आलेला 600 फूट केबल महावितरणने जप्त केला आहे.
Bhandara News: भंडारा: तुमसर शहरातील अतिक्रमणावर चालला बुलडोझर; नगरपालिकेची कारवाई
Bhandara News: भंडाऱ्याच्या तुमसर शहरातील मुख्य बाजार पेठं, बावनकर चौकपासून जुना बस स्टॉप, नवीन बस स्टॉप परिसरातील अतिक्रमणावर तुमसर नगरपालिकेनं बुलडोझर चालवला आहे. व्यापाऱ्यांनी रस्त्यावर व मुख्य नाल्यावर दुकानं थाटली. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने नाल्याची साफसफाई जोमात सुरू असून नाल्यावर दुकाने असल्याने नालेसफाई करण्याससुद्धा पालिकेला त्रास होत आहे. त्यामुळं पालिका प्रशासनानं पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.
बीडमध्ये झालेल्या तिहेरी अपघातामध्ये बापलेकाचा जागीच मृत्यू
Beed Accident : बीडच्या नेकनूरजवळ झालेल्या तिहेरी अपघातामध्ये बापलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेकनूर मांजरसुंबा रोडवर हा अपघात झाला. भरधाव कारने दोन दुचाकीला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामध्ये विनायक चौरे आणि विनोद चौरे या बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून भरधाव वेगात चालणाऱ्या वाहनांमुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलं असून वाहनं सावकाश चालवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज