एक्स्प्लोर

Sharad Pawar : सत्ता येते अन् जाते, पण सत्ता गेल्यानंतर कुणालाही इतकं अस्वस्थ झालेलं पाहिलं नाही; शरद पवारांचा भाजपला टोला

महाविकासआघाडी सरकार चांगले काम करत आहे म्हणून अनेकांना अस्वस्थता आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवारांनी भाजपवर  निशाणा साधला आहे

 मुंबई : सत्ता येते सत्ता जाते पण सत्ता गेल्यानंतर कुणालाही इतकं अस्वस्थ झालेलं मी पाहिले नाही. सत्ता आली तर लोकांसाठी काम करायचे असते आणि सत्ता गेली तर हसत हसत सत्ता सोडायची असते पण भाजपच्या लोकांचं वेगळं आहे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवारांनी भाजपवर  निशाणा साधला आहे.  गुरुवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. या बैठकीला  शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. 

सरकार चांगले काम करते म्हणून अनेकांना अस्वस्थता : शरद पवार

शरद पवार म्हणाले, उद्याच्या अधिवेशनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे.  दोन वर्षांपूर्वी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन हे सरकार आणले आहे. तुमचे सरकार चांगले काम करत आहे म्हणून अनेकांना अस्वस्थता आहे. सत्ता आली तर लोकांसाठी काम करायचे असते आणि सत्ता गेली तर हसत हसत सत्ता सोडायची असते पण भाजपच्या लोकांचं वेगळं आहे.

नवाब मलिकांच्या अटकेनंतर मागे न हटण्याचा ममतांचा पवारांना सल्ला

नवाब मलिकांच्या अटकेवर शरद पवार म्हणाले,  नवाब मलिक यांना अटक झाली तेव्हा ममता बॅनर्जी यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितले आमच्याकडे चार लोकांना अटक झाली मात्र आम्ही मागे हटलो नाही लढलो संघटना वाढवली. तुम्ही देखील  तेच करा.  नगरपंचायत निवडणुकीत  महाविकास आघाडीने चांगली कामगिरी  केली. जनता तुमच्या बरोबर आहे.  लोकांचा पाठिंबा आहे.  जनतेशी असलेल्या बांधिलकीमध्ये तडजोड करायची नाही.

 रशिया - युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची पंतप्रधान मोदींनी काळजी नाही : शरद पवार

रशिया - युक्रेन युद्धावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध सुरू आहे.  त्यामध्ये महाराष्ट्रातले सर्वात जास्त विद्यार्थी अडकले आहेत. या संकटाकडे सत्ताधारी लक्ष देत नाही. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. युनोमध्ये बैठक घेतली तेव्हा भारत तटस्थ राहिला. आपण रशियाविरोधात भूमिका घेतली नाही, युक्रेनच्या बाजूने भूमिका घेतली नाही म्हणून युक्रेनमध्ये  भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. मोदी सरकारचे चार मंत्री तिकडे गेले आहेत.  परंतु एकही मंत्री युक्रेन किंवा रशियात गेले नाही. केंद्र सरकारची चर्चेसाठी तयारी नाही. राहुल गांधी आणि आम्ही सर्व विरोधक चर्चेला तयार होतो मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विद्यार्थ्यांचे काही पडले नाही, असा आरोप शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला आहे. 

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar On Tatoba|ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्लीत नवीन मुख्य प्रवेशद्वाराचं उदघाटनAaditya Thackeray Mumbai : नवी मुंबई विमानतळावरुन आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल #abpमाझाManoj Jarange Dasra Melava | जरांगेंच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडाला फुलांची सजावट, तयारी कशी?ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 11 Oct 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
सयाजी शिंदेंना राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी, अजित पवारांची घोषणा; विधानसभेपूर्वीच काढला हुकमी एक्का
Arvind Kejriwal : फुकटातील रेवड्या अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
फुकटातील 'रेवड्या' अमेरिकेत पोहोचल्या! डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण शेअर करत केजरीवाल असं का म्हणाले?
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
कर्नाटकात स्थापना दिनी कन्नड ध्वज फडकावा, कन्नड भाषा कळाल्याशिवाय कोणीही राज्यात राहू शकत नाही! : डीके शिवकुमार
Embed widget