एक्स्प्लोर

Maharashtra Budget 2022: सापाच्या पिल्लाला 30 वर्षे दूध पाजलं, आता ते फुत्कारतंय; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

Maharashtra Budget 2022: महाविकास आघाडी सरकार भक्कम असून ते पाडून दाखवा असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं आहे.

मुंबई: सापाच्या पिलाला आम्ही 30 वर्षे दूध पाजले, ते पिल्लू आता वळवळ करत आमच्यावरच फुत्कारत आहे अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता केली आहे. सरकार पडणार म्हणतात, माझे 170 मोहरे आहेत, ते फोडून दाखवा असंही आवाहन त्यांनी भाजपला दिलं आहे. गुरुवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी एक बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते.

आजच्या या बैठकीला महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि शिवसेनेचे प्रमुख नेते तसेच आमदार उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना भाजपवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, "सध्या देशात एक विकृती आहे, एक घृणास्पद राजकारण सुरू आहे. आज इकडे धाड पाडतायत, तिकडे धाड पाडतायत, याला अटक करतायत, त्याला अटक करतायेत. मात्र आता हे खपवून घ्यायचं नाही. केंद्र सरकारच्या कोणत्याही दबावासमोर झुकू नका."

महाविकास आघाडी भक्कम
उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजप नेते म्हणतात की महाविकास आघाडीचे सरकार पडणार. पण माझ्याकडे 170 मोहरे आहेत, त्यांना फोडून दाखवा. मला सोडून ते तुमची गुलामगिरी पत्कारणार नाहीत. आपली एकजूट हीच आपली ताकद आहे." 

दाऊदला शोधून दाखवा, उद्धव ठाकरेंचे आव्हान
आम्ही कोणावर वार करत नाही, पण कोणी वार केला तर आम्ही त्याला सोडणार नाही असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले की, "रोज कोणीही उठतोय आणि दाऊदवर बोलतो. हिंमत असेल तर दाऊदला शोधून का आणत नाही? तिकडे पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफचा केक खाता, थडग्यांवर माथा टेकवता, मग दाऊदच्या मुसक्या का आळवत नाही?"

दरम्यान, गुरुवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार असून त्या आगोदर आज चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार टाकला होता तर मुख्यमंत्री अनुपस्थित होते. 

संबंधित बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Gokul Chairman Election 2026: राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळच्या अध्यक्षपदासाठी पहिलं नाव समोर; कोण आहेत अजित नरके?
राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळच्या अध्यक्षपदासाठी पहिलं नाव समोर; कोण आहेत अजित नरके?
दिवाळीनंतर मुंबईची हवा 'खराब', पण बांधकाम साईटचे बोर्ड सांगतायत 'चांगली', आवाज फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल
दिवाळीनंतर मुंबईची हवा 'खराब', पण बांधकाम साईटचे बोर्ड सांगतायत 'चांगली', आवाज फाऊंडेशनचा धक्कादायक अहवाल

व्हिडीओ

Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या दहिसर पश्चिम कांदारपाडा परिसरात फटाक्यामुळे लागली मोठी आग
Satej Patil on Gokul: सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
सतेज पाटलांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, महायुती सरकारने गुपित ठेवलेल्या चार संचालकांची नावंच सांगून टाकली, हसन मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांबाबतही सनसनाटी दावा
Gokul President Election 2026 Court Hearing: गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
गोकुळची निवडणूक उद्याच, शासन नियुक्त संचालक मतदान करणार, पण मतं बाजूला ठेवणार; अध्यादेश चूक की बरोबर हे न्यायालयाचं अद्याप ठरलं नाही
Embed widget