एक्स्प्लोर

Osmanabad Dharashiv : उस्मानाबादचं नामांतर झालेल्या 'धाराशिव'चा वैभवशाली इतिहास! रोम, आफ्रिका देशातील लोकांचे होते वास्तव्य

Osmanabad Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात रोम, आफ्रिका तसेच अनेक देशातील लोक राहत होते. याचे अनेक पुरावे इथे सापडले आहेत. इतिहास व पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे सांगतात...

Osmanabad Dharashiv : औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. धाराशिव जिल्ह्याला प्राचीन असा वैभवशाली इतिहास लाभला आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे सातवाहन काळात या जिल्ह्यात तगर सारखी व्यापारी नगरे उदयाला आली. तेर सारख्या ठिकाणी सातवाहन राजा पुळुमावी याचे दोन शिलालेख व अनेक नाणी आता पर्यंत सापडली आहेत. कोकणातील शिलाहार राजे स्वतःला तगरपुरचे आम्ही रहिवाशी आहोत असे अभिमानाने सांगतात. तर याच धाराशिव जिल्ह्यात रोम, आफ्रिका तसेच अनेक देशातील लोक राहत होते. याचे अनेक पुरावे इथे सापडले आहेत. उदा.दाखल जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द या ठिकाणी रोमन आडनाव असलेली मराठी कुटुंबे आज ही राहतात. इतिहास व पुरातत्व अभ्यासक जयराज खोचरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Osmanabad Dharashiv : उस्मानाबादचं नामांतर झालेल्या 'धाराशिव'चा वैभवशाली इतिहास! रोम, आफ्रिका देशातील लोकांचे होते वास्तव्य

भव्य असे शिवलिंग व गणपतीचे शिल्प
तर धाराशिवकर असणारी ही अनेक कुटुंबे या जिल्ह्यात आहेत. तर ग्रामीण भागातील जुनी जाणती लोकं आज ही धारशिव हाच उल्लेख करताना दिसतात. धाराशिव शहराजवळ राष्ट्रकूट काळात चमार लेणी खोदल्या गेल्या या लेणी मध्ये भव्य असे शिवलिंग व गणपतीचे शिल्प पहायला मिळते. हे शिवलिंग हे धाराशिव जिल्ह्यातील सर्वात जुने असे शिवलिंग असून याच शिवलिंगावरून या ठिकाणी असलेल्या गावाचे नाव धारशिव असे पडले. त्याच बरोबर शहराच्या पश्चिमेला 6 व्या शतकात खोदल्या गेलेल्या लेणी ह्या धाराशिव लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत. तेरच्या शिव राजाचाही उल्लेख या नावाच्या संदर्भात येताना दिसतो. धाराशिव गावाची ग्रामदेवी हिचे देखील नाव हे श्री धारासुर मर्दिनी हे असून धाराशिव हे याच प्राचीन नावाकडे लक्ष वेधते.

Osmanabad Dharashiv : उस्मानाबादचं नामांतर झालेल्या 'धाराशिव'चा वैभवशाली इतिहास! रोम, आफ्रिका देशातील लोकांचे होते वास्तव्य

  • इ. स. 1720 ची छत्रपती शाहू ( छ. संभाजी महाराज यांचे पुत्र ) महाराज यांची सनद आज ही उस्मानाबाद मधील विजयसिंह राजे यांच्याकडे पाहायला मिळते. ही मोकासदारी बद्दलची सनद असून यात कसबे धारशिव असे स्पष्ट लिहिले आहे.

  • धाराशिव शहरातील अनेक कुटुंबाकडे खास करून गावच्या पवार पाटील यांच्याकडे कसबे धाराशिव नाव असलेली अनेक मध्ययुगीन कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यात मजहर, सनद, पत्रे, वंशावळी आजही पाहिला मिळतात.

Osmanabad Dharashiv : उस्मानाबादचं नामांतर झालेल्या 'धाराशिव'चा वैभवशाली इतिहास! रोम, आफ्रिका देशातील लोकांचे होते वास्तव्य

  • 1905 साली उस्मान मीर अली खान हे धाराशिव परिसरास आले. त्यांच्या भेटी प्रित्यर्थ धारशिवचे उस्मानाबाद हे नामांतर करण्यात आले.

  •  त्याही पेक्षा महत्वाचे उस्मानाबाद हा निजामाचा सरफेखास जिल्हा होता. म्हणजे निजाम उस्मान अली खान यांच्या व्यक्तिगत खर्चाची सोय या जिल्ह्यातील महसूलातून करण्यात येत होती.

  •  निजाम काळात नळदुर्ग हा जिल्हा होता तो बदलून धाराशिव हे जिल्ह्याचे ठिकाण करण्यात आले.

  • याचे कारण म्हणजे हा धाराशिव जिल्हा हा ब्रिटिश आमल असलेल्या भागाशी संलग्न होता भविष्यातील धोका लक्षात घेऊन निजाम सरकारने नळदुर्ग ऐवजी धारशिव जिल्हा केला गेला.

  •  धारशिव शहरातील जुन्या गावात आज ही मध्ययुगीन काळातील गढी आज ही सुस्थिती मध्ये असून या गढीवर धाराशिव नाव असलेला उल्लेख आहे.

  •  उस्मानाबाद जिल्ह्याचे पूर्वीचे नाव धाराशिव होते. हे कोणीही नाकारू शकत नाहीत याचे सबळ व प्रथम दर्जाचे पुरावे आज उपलब्ध आहेत.

  • विशेष म्हणजे आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही यांच्या काळातील ऐतिहासिक कागदपत्रातून देखील धारशिव गावाचे उल्लेख आढळून येतात.
          
 उस्मानाबादचे धाराशिव हे सांस्कृतीक नाव

स्मानाबादचे मुळचे नावच धाराशिव आहे. धाराशिव हे नाव 1927 पर्यंत प्रचलित होते. उस्मानाबाद शिवाय एदलाबादचे मुक्ताईनगर...अंबोजोगाईचे मोमिनाबाद आणि पुन्हा अंबाजोगाई असे नामांतर काँग्रेसच्या काळात झाले आहे, तीही ही नावे ऐतिहासिक होती म्हणून. औरंगाबाद हे मलिक अंबरने वसविलेले शहर आहे. त्या शहराच्या नामांतराची सेनेची भूमिका राजकीय आहे. उस्मानाबादचे धाराशिव हे सांस्कृतीक नाव आहे, असे इतिहासाचे अभ्यासक जयराज खोचरे यांनी सांगतात. 

उस्मानाबाद की धाराशिव? इतिहास काय सांगतो?
निजामाने मराठवाड्यातील अनेक शहरांची नामांतरे केली होती. त्यामध्ये उस्मनाबाद या शहराचाही समावेश आहे. उस्मानाबादचं जुनं नाव धाराशिव असंच  होतं. ग्रामदैवत असलेल्या धारासुर मर्दिनी या देवीच्या नावावरून धाराशिव असल्याचे पुरावे सापडतात. पण निजामशाही मधील सातवा निजाम उस्मान अली खान याच्या नावावरून धाराशिव शहराचे नाव उस्मानाबाद झाल्याचेही संदर्भ आढळतात. नगर परिषदेच्या सुधारित नगर विकास योजनेच्या प्रकरण एक मध्ये उस्मान अली खान यांनी सन 1900 साली धाराशीव हे नाव बदलून उस्मानाबाद केलं, असा उल्लेख आहे.

संबंधित बातम्या

Osmanabad Name change : उस्मानाबादचं नामांतर धाराशिव, 25 वर्षांपूर्वीच झाला होता निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
Mumbai Crime: गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गूढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गूढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
Kartiki Ekadashi 2024: सोहळा कार्तिकीचा, गजर हरीनामाचा! कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंजवार यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा
पंढरीत रंगला, सोहळा कार्तिकीचा; पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 12 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 Headlines | सकाळी 6 च्या शंभर हेडलाईन्स | 6 AM 12 November 2024 | ABP MajhaCM Eknath Shinde : साकीनाक्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला, संतोष कटके नावाच्या व्यक्तीने अडवला ताफाABP Majha Headlines | 6.30 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 12 NOV 2024 TOP Headlines

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
मोठी बातमी: सोलापुरात आडम मास्तरांच्या घरावर दगडफेक, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
RSS वर बंदी, पोलीस भरतीत मुस्लिमांना प्राधान्य द्या, उलेमा बोर्डाने मविआला धाडलं पत्र, विहिंप आक्रमक
Mumbai Crime: गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गूढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
गोराईत 7 तुकडे केलेला मृतदेह सापडला, हातावरच्या टॅटूने गूढ वाढलं, मुंबई पोलीस संभ्रमात
Kartiki Ekadashi 2024: सोहळा कार्तिकीचा, गजर हरीनामाचा! कार्तिकी एकादशीनिमित्त पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंजवार यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा
पंढरीत रंगला, सोहळा कार्तिकीचा; पुण्याच्या विभागीय आयुक्तांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न
Horoscope Today 12 November 2024 : आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sharad Pawar :  निवडणूक साधी समजू नका, राज्याचं हित न पाहणाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावी लागेल, मविआच्या उमेदवारांना विजयी करा : शरद पवार
शेतकऱ्यांना कर्जमाफी, महिलांना महालक्ष्मी योजनेचे 3 हजार अन् मोफत एसटी प्रवास, शरद पवारांनी मुक्ताईनगरमध्ये मविआचा जाहीरनामा मांडला
Horoscope Today 12 November 2024 : आज कार्तिकी एकादशीचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज कार्तिकी एकादशीचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
एकनाथ शिंदे उद्या ठाकरे आडनाव लावून फिरतील; देवाच्या आळंदीतून आदित्य ठाकरेंचा घणाघात
Embed widget