(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Horoscope Today 12 November 2024 : आज देवउठनी एकादशी; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 12 November 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 12 November 2024 : पंचांगानुसार, आज 12 नोव्हेंबर 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आर्थिक दृष्टीने फायदा करून देणारा दिवस आहे, फक्त शांत डोक्याने काम करा.
वृषभ (Taurus Horoscope Today)
तुमच्या हिशेबी वृत्तीमुळे आज कामाला गती येईल. महिला दुसऱ्यांना सहकार्य करतील.
मिथुन (Gemini Horoscope Today)
लेखकांना आपल्या कल्पना कागदावर उतरवण्यात यश मिळेल. आज कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये.
कर्क (Cancer Horoscope Today)
आज निर्मितीचा आनंद उपभोगणार आहात, परंतु हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये.
सिंह (Leo Horoscope Today)
एखादे काम पैशाच्या जोरावर सहजगत्या पार पाडू शकता.
कन्या (Virgo Horoscope Today)
आज एखाद्या कामामध्ये प्रगती झाली नाही तर नाराज होऊ नका. नेटाने काम पुढे चालू ठेवा.
तूळ (Libra Horoscope Today)
पैशाची परिस्थिती सुधारेल. घरामध्ये अल्हाददायक बदल कराल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
नोकरीमध्ये प्रमोशनचे चान्सेस निर्माण होतील. महिलांनी समोपचाराचे धोरण स्वीकारावे.
धनु (Sagittarius Horoscope Today)
आज उत्साहाचा न आटणारा झरा तुमच्यामध्ये सगळ्यांना दिसणार आहे, त्यामुळे जेथे जाल तिथे आनंद निर्माण कराल.
मकर (Capricorn Horoscope Today)
संततीच्या बाबतीत पैसा खर्च करावा लागेल. प्रेमवीरांच्या प्रेमाला दाद मिळेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य राहील. कलाकारांना कला दाखवण्याची संधी मिळेल.
मीन (Pisces Horoscope Today)
तुमच्या बौद्धिकतेला आव्हान देणाऱ्या घटना घडतील आणि नोकरी व्यवसायामध्ये त्याचा फायदा करून घ्याल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: