एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Background

अमरावतीत सलग चौथ्या दिवशी संचारबंदी कायम, इंटरनेट सुरु होणार की बंदच राहणार यावर आज निर्णय 

Amravati Violence : त्रिपुरातील कथित घटनेनंतर झालेल्या हिंसाचारामुळे अमरावती शहर वगळता जिल्ह्यातील संचारबंदी सलग चौथ्या दिवशी कायम आहे. तीन दिवसांसाठी बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा आणखी 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आज दुपारनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. पण उद्यापासून इंटरनेट सेवा सुरु होते की, बंदच राहते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर तिकडे अमरावतीतील दंगल भडकवल्याप्रकरणी अटक केलेले भाजप नेते अनिल बोंडेंसह (Anil Bonde Arrest) सर्व भाजप नेत्यांना जामीन मंजूर झाला आहे. काल सकाळी अमरावती पोलिसांनी बोंडेंसह भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, गटनेते तुषार भारतीय, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्यासह 12 जणांना अटक केली होती. 

शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांना मुंबई पोलिसांचं दुसरं समन्स; चौकशीसाठी गैरहजर

Mumbai Cruise Drug Case :  क्रूझ ड्रग प्रकरणातील पंच प्रभाकर साईलच्या एफिडेबिटसोबतच इतर तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्पेशल इन्क्वॉयरी टीम (SIT) तयार केली आहे. या पथकानं पुन्हा तपास सुरु केला, पण तपास पुन्हा एकदा थांबला कारण, दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतरही बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी चौकशीसाठी मुंबई पोलिसांसमोर हजर झालीच नाही. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय कारवाई करावी यासाठी मुंबई पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे. 

मुंबईतील अग्नितांडव आटोक्यात, सॅमसंगच्या सर्व्हिस सेंटरसह सफोला तेलाच्या गोदामाचं मोठं नुकसान

Mumbai kanjurmarg Fire : मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातील अपेक्स कंपाऊंडमध्ये असलेल्या सॅमसंगचा सर्विस सेंटरमध्ये लागलेली आग मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास नियंत्रणात आली आहे. काल रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 18 ते 20 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या. तब्बल साडे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.  

सध्या सर्विस सेंटरमध्ये फायर कूलिंगचे काम सुरू आहे.  सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र सॅमसंग कंपनीचं मोठ्याप्रमाणात सामान जळून खाक झालं आहे. तर बाजूला असलेलं सफोला तेलाचं गोडाऊनसुद्धा या आगीमध्ये जळून खाक झाला आहे.

IND vs NZ: जयपूरमधील टी-20 मॅचवर प्रदुषणाचं सावट

India v New Zealand : भारत-न्यूझीलंड यांच्यातील ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे.. अशातच जयपूर येथे होणाऱ्या पहिल्या सामन्यावर दूषित हवामानाचे सावट उभे ठाकले आहे. जयपूरमधील प्रदूषणाची पातळी गेल्या आठवडय़ाभरात वाढली असल्याने पहिल्या लढतीच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जयपूरच्या सभोवताली असणाऱ्या दिल्ली, गुडगांव, सोनपत यांसारख्या शहरांतील हवामान दूषित झाले असून हवेचा वेग वाढल्याने जयपूरलासुद्धा त्याचा फटका बसत आहे. तसेच तेथील अनेक नागरिकांना श्वास घेताना अडचण जाणवत असल्याचेही समजते. जयपूरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 337 पर्यंत घसरला आहे. दिवाळीदरम्यान हा निर्देशांक 364 इतका होता. भारतातील गेल्या दोन आठवडय़ांतील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये जयपूर दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे जयपूरमधील टी-20 सामन्यावर परश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपविजेता न्यूझीलंडचा संघ यूएईतून भारतात दाखल झालाय. तर जयपूरमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वात  भारतीय संघानं सराव सुरु केलाय.

22:57 PM (IST)  •  16 Nov 2021

अमरावती शहरात चार तासांची संचारबंदीतून शिथिलता

 अमरावती शहरात उद्यापासून चार तासांची संचारबंदीतून शिथिलता देण्यात आली आहे. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानं उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. उद्यापासून शहरातील सर्व बँका उघडणार पण इंटरनेट बंद असल्याने व्यवहार बंद राहण्याची शक्यता आहे.  इंटरनेट सेवा 19 तारखेच्या दुपारी 3 वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती अमरावती पोलिस आयुक्त कार्यालयाने दिली आहे. 

17:05 PM (IST)  •  16 Nov 2021

सगळेच मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजत आहेत - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री आहेत पण त्यांना मानायला कुणी तयार नाही. सगळेच मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही. गांजा, हर्बल तंबाखू, दंगली, वसुलीवर महाविकास आघाडीचं सरकार चर्चा करत आहे.

16:57 PM (IST)  •  16 Nov 2021

महाराष्ट्रात सरकार कुठे आहे हे विचारण्याची वेळ आली आहे: देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात सरकार कुठे आहे हे विचारण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले.

16:55 PM (IST)  •  16 Nov 2021

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शुभेच्छा: देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी आम्हा सर्वांकडून शुभेच्छा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

13:19 PM (IST)  •  16 Nov 2021

पूर्वांचल एक्स्प्रेसवेचं आज उद्घाटन, पंतप्रधान मोदी वायूसेनाच्या विमानानं कार्यक्रम स्थळी पोहचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 340 किमीच्या पूर्वांचल एक्स्प्रेस वेचं उद्घाटन करणार आहेत. कार्यक्रमस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी वायूसेनाच्या विमानानं पोहचले आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : 'इंडिया'आघाडी दिल्लीत फुटणार? ते मुंबईतील रखडलेल्या पुलांची समस्याZero Hour Mumbai Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे :मुंबईत रखडलेल्या पुलांची समस्या अन् वाहतूक कोंडीZero Hour :विरोधकांची इंडिया आघाडी दिल्लीत फुटणार? Anand Dubey Atul Londhe Keshav Upadhyay EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget