एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates : देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

Background

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

राणा दाम्पत्याच्या जामीनावर आज सुनावणी
राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या राणा दांपत्याकडून मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. आयपीसी कलम 124 A मध्ये दंडाधिकारी कोर्टाला जामीनाचे अधिकारच नसल्यानं तो मंगळवार सकाळपर्यंत मागे घेण्यात येणार आहे. मुंबई सत्र न्यायालयात पहिल्याच सत्रात यावर सुनावणी घेण्यात येणार आहे. 

मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश  
औरंगाबाद येथील राज ठाकरेंच्या 1 मेच्या सभेआधीच मनसे माजी जिल्हाध्यक्ष  सुहास दाशरथे यांचा मनसेला रामराम केला आहे. दाशरथे आज मुंबईत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. 

आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर 
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दुपारी साडेबारानंतर ठाकरे दिल्लीत पोहोचतील. यावेळी राजकीय भेटीगाठी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री वळसे-पाटील आणि संजय राऊतांविरोधातील जनहित याचिकेवर सुनावणी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत आणि इतरांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या जनहित याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

सीबीएसई बोर्डाची परीक्षा 
सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. देशभरात एकूण 7412 परीक्षा केंद्रे असतील. सुमारे 34 लाख मुले परीक्षेला बसले आहेत. (10वी आणि 12वी दोन्ही) दहावीची परीक्षा 24 मेपर्यंत तर बारावीची परीक्षा 15 जूनपर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांना सकाळी साडेनऊ वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचायचे आहे. परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 पर्यंत चालणार आहे.  

पंतप्रधान दिल्लीतील कार्यक्रमात सहभागी होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 वाजता 7 लोककल्याण मार्गावर 90 व्या शिवगिरी तीर्थयात्रा ब्राह्मो विद्यालयाच्या वर्धापन दिन आणि सुवर्ण महोत्सवाच्या वर्षभराच्या संयुक्त सोहळ्याच्या उद्घाटनात सहभागी होतील.

डायलॉगच्या तीन दिवसीय परिषदेचा दुसरा दिवस
दिल्लीत 7 व्या रायसीना डायलॉगच्या तीन दिवसीय परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. आज परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आदी मंक्षी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.  

काँग्रेसची बैठक 
आज सकाळी 11 वाजता काँग्रेसच्या शिस्तपालन समितीची बैठक होणार असून त्यात काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते सुनील जाखर आणि केव्ही थॉमस कारवाईचा निर्णय घेणार आहेत.

कुमार विश्वास आणि अलका लांबा चौकशीला हजर राहणार
पंजाब पोलिसांनी आज आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास आणि अलका लांबा यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील 'प्रक्षोभक विधानां'बद्दल दाखल केलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात चौकशीसाठी बोलावले आहे. 

लखीमपूर हिंसाचारप्रकरणी आरोप निश्चितीवर सुनावणी
यूपीमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर आज जिल्हा न्यायालयात आरोप निश्चित करण्यासाठी सुनावणी होणार आहे.

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आज मॉस्कोला भेट देणार

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आज मॉस्कोला भेट देणार असून ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत.

रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने 

आज आयपीएलमध्ये (IPL 2022) रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स (Royal challengers bangalore vs Rajsthan Royals) या दोन संघ मैदानात उतरणार आहेत. सायंकाळी 7.30 वाजता दोन्ही संघात सामना होईल. 

22:21 PM (IST)  •  26 Apr 2022

Raigad News Update : राडगड येथील पेण येथे मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना अटक

Raigad News Update : राडगड येथील पेण येथे मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यावेळी तीन मांडूळ जप्त करण्यात आली आहेत. दादर सागरी पोलिसां नी ही कारवाई केली आहे। 

19:56 PM (IST)  •  26 Apr 2022

Yavatmal News Update : यवतमाळ जिल्ह्यातील निर्गुडा नदिपात्रात कोसळल्याने युवकाचा मृत्यू

Yavatmal News Update : यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील 17 वर्षीय युवकाचा निर्गुडा नदिपात्रात कोसळल्याने मृत्यू झाला. सागर राजू टावरी असे मृत तरूणाचे नाव आहे. सागर हा  त्याच्या काही मित्रांसोबत मुकुटबन मार्गावरील निर्गुडा नदिच्या पुलावर गेला होता. 

19:21 PM (IST)  •  26 Apr 2022

गुणरत्न सदावर्ते 18 दिवसानंतर जेलमधून बाहेर

#LIVE :  गुणरत्न सदावर्ते 18 दिवसानंतर जेलमधून बाहेर आले आहेत. यापुढेही आपला लढा सुरूच राहिल असे सदावर्ते यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतर म्हटले आहे. 

17:34 PM (IST)  •  26 Apr 2022

राज्यात 1 मे रोजी वंचित शांती मार्च काढणार ; प्रकाश आंबेडकरांची माहिती 

राज्यातील अनेक मंत्री ईडीच्या चौकशी कक्षेत आहेत. भोंग्यांचा प्रश्न केंद्राकडे टोलवून सरकारला आपल्या मंत्र्यांना अभय द्यायचं आहे. असा आरोप करत भोंग्यावर सरकारची भूमिका मनसेला पुरक आहे का? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. याबरोबरच भोंग्यांवरून महाराष्ट्रात 3 तारखेला काही अघटीत होऊ शकतं, अशी शंका देखील आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. राज्यात 1 मे रोजी वंचित शांती मार्च काढणार अशी माहितीही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिली.  

17:20 PM (IST)  •  26 Apr 2022

Pune Fire : पुण्यातील कोंढवा परिसरातील गोडाऊनला भीषण आग, दहा अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

 Pune Fire : पुण्यातील कोंढवा बुद्रुक, पारगे नगर येथे येथे एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे.  अग्निशमन दलाकडून  दहा अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून विझवण्याचे काम सुरू आहे, 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 09 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Full : 'इंडिया'आघाडी दिल्लीत फुटणार? ते मुंबईतील रखडलेल्या पुलांची समस्याZero Hour Mumbai Mahapalika :महापालिकेचे महामुद्दे :मुंबईत रखडलेल्या पुलांची समस्या अन् वाहतूक कोंडीZero Hour :विरोधकांची इंडिया आघाडी दिल्लीत फुटणार? Anand Dubey Atul Londhe Keshav Upadhyay EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
खासगी विकासकाने चार वर्षांचं भाडं दिलं नाही, झोपडीधारकाची आत्महत्या, जोगेश्वरीमधील घटना
Devendra Fadnavis : वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
वाढवण ते नाशिक हायस्पीड कनेक्टिविटी तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश
Manoj Jarange Patil and Anjali Damania : मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
मनोज जरांगे पाटील आणि अंजली दमानिया यांच्यावर लातूर जिल्ह्यात तिसरा गुन्हा दाखल
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
शिव्या, शाप, आरोप... आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीवर एकनाथ शिंदे बोलले; म्हणाले, ही नवी जात
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
हेल्थ इज वेल्थ: हृदयाच्या संबंधित रुग्णांनी कराव्यात 'या' आरोग्य तपासण्या; रक्तदाब निरीक्षणही महत्त्वाचे
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
पुणे विद्येचं माहेरघर, शहरातील प्रत्येक शिक्षणसंस्थेवर संघाचे लोक; शरद पवारांकडून पुन्हा RSS चं कौतुक
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
बीड जिल्ह्यात वर्षभरात 40 खुनाचे गुन्हे, सर्वच उघड करण्यास पोलिसांना यश; गतवर्षीच्या तुलनेत सरस कामगिरी
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
धक्कादायक! घराबाहेर पडलेल्या 80 वर्षाच्या महिलेवर बिबट्याची झडप, 500 मीटर फरफटत नेले, मृतदेह छिन्नविछिन्न
Embed widget