Maharashtra Breaking News LIVE Updates : गुणरत्न सदावर्ते यांना उद्या 11 वाजता कोर्टात सादर केलं जाणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. अनेक अनुयायी विविध मार्गाने आपल्या डॉ. आंबेडकरांना मानवंदना देत असतात. कोरोनानंतर पहिल्यांदा मोठ्या उत्साहात जयंती साजरी करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्य सरकारच्या वतीने साजरी केली जाणार आहे. मुंबईतील दादर स्थित चैत्यभूमी स्मारक अभिवादन कार्यक्रम होणार आहे
आलिया आणि रणबीर आज विवाहबंधनात अडकणार
आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आलिया आणि रणबीरच्या प्री वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली असून 14 एप्रिलला दोघे सात फेरे घेणार आहेत. रणबीरची आई नीतू कपूर यांनी आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या तारखेसंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. आरके हाऊसमध्ये उद्या आलिया आणि रणबीर लग्नबंधनात अडकणार आहेत.
राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगणार
आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यामध्ये सामना होणार आहे. यंदाच्या हंगमातील हा 24 वा सामना असेल. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. यंदाच्या हंगमात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजतार टायन्स संघाने चार सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. तर संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघानेही पहिल्या चार सामन्यात तीन विजय मिळवले आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे गुणतालिकेत राजस्थानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातचा संघ सहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांघाईतील भारतीय दूतावासातील 'इन-पर्सन' सेवा बंद
चीनच्या शांघाईमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतीय वाणिज्य दूतावासात 'इन-पर्सन' सेवा म्हणजे दूतावास परिसरात जाऊन भेटण्यास बंदी घातली आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सातारा शहर पोलीस ठाण्यातून लॉकअपमध्ये होणार रवानगी
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची सातारा शहर पोलीस ठाण्यातून थोड्याच वेळात लॉकअपमध्ये रवानगी करण्यात येणार आहे.
बढतीत आरक्षण लागू करण्यासाठी मोदी सरकारकडून हालचाली सुरू, आकडेवारी गोळा करण्याचे आदेश
Reservation : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बढतीत आरक्षण लागू करण्याच्या मोदी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अधिकृत पत्रक काढून सर्व मंत्रालयांना याबाबतची आकडेवारी गोळा करण्याचे आणि त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय सेवेत मध्यम ते वरिष्ठ पदांवर काम करणाऱ्या एससी आणि एसटी वर्गातल्या अधिकाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाने या वर्षी 28 जानेवारीला याबाबत निर्णय देताना काही गोष्टींची अपेक्षा व्यक्त केली होती.
Gunratan Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकेची कागदोपत्री कारवाई पूर्ण
Gunratan Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकेची कागदोपत्री कारवाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्यांचा आज रात्रीचा मुक्काम सातारा शहर पोलीस ठाण्यात असणार आहे. शासकीय डॉक्टरांच्या पथकाने गुणरत्न सदावर्ते यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी पोलीस ठाण्यात करून घेतली आहे.
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना उद्या 11 वाजता कोर्टात सादर केलं जाणार
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना उद्या 11 वाजता कोर्टात सादर केलं जाणार आहे. आज सदावर्ते यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार जाणार आहे. तपास अधिकारी भगवान निंबाळकर यांनी माहिती दिली आहे.
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेच्या विरोधात सातारा पोलिस स्थानकाच्या बाहेर घोषणाबाजी
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेच्या विरोधात घोषणा देत मराठा सकल मोर्चातील आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराचे काही मावळे सातारा शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर जमलेल्या असून सातारा शहर पोलिसांनी बाहेर केली घोषणाबाजी सुरू केलेली आहे.