Maharashtra Breaking News 13 September 2022 : बीडमध्ये साडेचार लाख रूपयांचा गुटखा जप्त, दोघांना अटक
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
रक्ताने पत्र लिहून हिंगोलीच्या शेतकऱ्याची नुकसानीच्या मदती मागणी
हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाने शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीला मदत जाहीर करण्यात आली आहे. परंतु, या मदतीत जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येणाऱ्या अनेक मंडळ नुकसानीच्या कक्षेत बसत नसल्याने त्यांना मदत मिळणार नाही. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी नामदेव पतंगे यांनी रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत आपली व्यथा मांडली आहे.
बीडमध्ये साडेचार लाखाचा गुटखा जप्त
बीडच्या परळी शहरात विद्यानगर भागात एका टेम्पोतून गुटका विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी टेम्पोवर कारवाई करून 4लाख 59 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोघा जणांना अटक केली आहे.
श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन, पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास
सातारा : श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील जहांगीर रुग्णालयामध्ये त्यांनी अखरेचा श्वास घेतला. शिवाजीराजे भोसले हे स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांचे भाऊ होते. तर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचे काका होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली.
नांदेडमध्ये विषय शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे शाळेतच ठिय्या आंदोलन
नांदेड : नायगाव तालुक्यातील मांजरम जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विषय शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले नाहीये. त्यामुळे विषय शिक्षक तत्काळ उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी मांजरम येथील जि.प. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आज शाळेतच ठिय्या आंदोलन सुरू केलंय.
कणकवली मधील ओसरगावात 48 लाखांच्या दारुसह 55 लाखांचा मुद्देमाल जप्त, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
कणकवली मधील ओसरगावात 48 लाखांच्या दारुसह 55 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. राज्य उत्पादन शुल्क कणकवली विभागाच्या पथकाने ही कारवाई केलीय. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कणकवली जवळील ओसरगाव पोस्ट बस थांब्याजवळ गोवा बनावटीचा मद्यासाठा जप्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

