(Source: ECI/ABP News/ABP Majha)
08 march 2022 LIVE Updates : बोईसर तारापूर येथील निर्भय कंपनीला भीषण आग
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Sanjay Raut Press Conferance : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पत्रकार परिषद घेणार आहेत. आज दुपारी 4 वाजता शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan) ही पत्रकार परिषद होणार आहे. याआधीही संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोप केला होता. तसेच, भाजप नेत्यांकडून केंद्रीय यंत्रणांचा होणाऱ्या गैरवापरावरही संजय राऊतांनी बोट ठेवलं होतं. मागच्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि नील सोमय्यांना (Neil Somaiya) तुरुंगात टाकणार असल्याचंही राऊत म्हणाले होते. तसेच मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावरही राऊतांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वतः ट्वीट करुन पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली. याआधी राऊतांनी 15 फेब्रुवारीला शिवसेना भवनात दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत भाजपसह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या निशाण्यावर भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या होते. तसेच, पत्रकार परिषदेनंतर जेव्हा-जेव्हा संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला, त्या-त्या वेळी त्यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. एवढंच नाहीतर, लवकरच हे पिता-पुत्र तुरुंगात जाणार असल्याचा दावाही संजय राऊतांनी वारंवार केला आहे. त्यामुळं आता आज ते कोणता बॉम्ब फोडणार? कोणते नेते त्यांच्या निशाण्यावर असणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचा 13 वा दिवस; तिसऱ्या फेरीतील चर्चाही निष्फळ
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये मागील 13 दिवस युद्ध सुरू आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून कडवा प्रतिकार सुरू आहे. एका बाजूला युद्ध सुरू असताना दुसरीकडे दोन्ही देशांकडून शांतता चर्चा सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये झालेली तिसऱ्या फेरीतील चर्चा निष्फळ ठरली आहे.
रशिया आणि युक्रेन दरम्यान तिसऱ्या फेरीतील चर्चा बेलारूसच्या सीमेवर झाली. युक्रेनच्या शिष्टमंडळातील सदस्य पोडोलीक यांनी सांगितले की, परिस्थितीत सुधारणा होईल, काही ठोस निर्णय घेतला जाईल अशी चर्चा झाली नाही. मात्र, युद्धबंदी आणि सुरक्षेच्या हमीसह इतर मुद्यांवर चर्चा सुरूच राहणार आहे. तर, रशियन शिष्टमंडळाचे प्रमुख मेडिंस्की यांनी सांगितले की, युक्रेनसोबत झालेल्या चर्चेत आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. राजकीय आणि लष्करी मुद्यावर चर्चा सुरू आहे. लवकरच काही सकारात्मक निर्णय होईल असे म्हणणे चुकीचे ठरेल असे त्यांनी म्हटले.
बोईसर तारापूर येथील निर्भय कंपनीला भीषण आग
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर N69 मधील निर्भय कंपनीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Sanjay Raut : पुढच्या पत्रकार परिषदेत ईडीच्या अधिकाऱ्यांची नावं जाहीर करणार ; संजय राऊत यांचा इशारा
Sanjay Raut : केंद्रीय तपास यंत्रणांना चौकशीचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनाही अधिकार आहेत. पुढच्या पत्रकार परिषदेत ईडीच्या अधिकाऱ्यांची नावं जाहीर करणार ; संजय राऊत यांचा इशारा
Sanjay Raut : किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र तुरूंगात जातील : संजय राऊत
Sanjay Raut : किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र तुरूंगात जातील. नील सोमय्या हे वाधवान यांच्यासोबत निकॉन इन्फ्रा कंपनीचे बिझनेस पार्टनर आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut : पीएमसी बॅंक घोटाळ्याशी किरीट सोमय्या यांचा काय संबंध? संजय राऊत
Sanjay Raut : पीएमसी बॅंक घोटाळ्याशी किरीट सोमय्या यांचा काय संबंध आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
Sanjay Raut : शंभरहून जास्त बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी घेतली : संजय राऊत
Sanjay Raut : शंभरहून जास्त बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणी घेतली ; संजय राऊत यांचा आरोप