Shirdi : शिर्डीत साईंची काकड आरती, शेजारती होणार लाऊडस्पीकर विना; सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत परवानगी, भक्तांमध्ये नाराजी
Shirdi News : राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर पोलिस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या असून याचा फटका शिर्डीच्या साईमंदिराला देखील बसलाय.
Loudspeaker Controversy : राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर पोलिस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या असून याचा फटका शिर्डीच्या साईमंदिराला देखील बसलाय. साईबाबांची पहाटे होणारी काकड आरती आणि रात्री 10.30 ला होणारी शेजारती आता लाऊडस्पीकर विनाच पार पडणार आहे. पोलिसांनी सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत साईबाबा संस्थानला लाऊडस्पीकर परवानगी दिली असल्याने स्पीकरविना होणाऱ्या आरतीमुळे भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.
शिर्डीत साईंची काकड आरती, शेजारती होणार स्पीकरविनाच; भक्तांमध्ये नाराजी
दरम्यान सकाळी काकड आरतीच्या वेळी स्पीकर बंद असल्याने अनेक भक्तांना आरती सुरू झाली की नाही? हा संभ्रम होता. मात्र याचवेळी काशी येथून आलेल्या एका भक्ताने आपल्या जवळील मोबाईलवर काकड आरती सुरू केली. दरम्यान, मंदिरात जाऊ न शकणाऱ्या भक्तांनी द्वारकामाई परिसरात मोबाईलच्या आवाजवरच साईंची काकड आरती केली.
पहाटेची काकड आरती स्पीकरवरुन प्रसारीत करण्यात आली नाही
दरम्यान, शिर्डीत द्वारकामाई येथे लाऊड स्पीकर लावत साई मंदीरात होणाऱ्या चारही आरत्याचं प्रसारण केल जाते. साईमंदीरात आरत्यांना उपस्थित राहू न शकणारे भाविक याच लाऊडस्पीकरच्या माध्यामातून आरत्यांचा आवाज एकत सहभागी होत असतात. साईच्या मंदीरात पहाटे 5 वाजता भुपाळी रेकॉर्ड सुरू होते त्या नंतर पहाटे 5.15 वाजता काकड आरती केली जाते. त्यानंतर सकाळी 5.50 वाजता मंगलस्नान केले जाते, तर रात्री 10.00 वाजता शेजारती सुरु होते, यापूर्वी या आरत्या साईमंदीर आणि परिसरात लावण्यात आलेल्या स्पीकरद्वारे ऐकवल्या जात होत्या. मात्र 3 मे ला शिर्डी पोलीसांनी साईबाबा संस्थानला पत्राद्वारे सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशानुसार रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी नसल्याने साईमंदीरावरील लाऊडस्पीकर वापरु नये, असे आदेश दिल्याने 3 मे या दिवशी रात्री साईमंदीरात झालेली शेजारती आणी 4 मे या दिवशी पहाटेची काकड आरती स्पीकरवरुन प्रसारीत करण्यात आली नाही. दरम्यान कोर्टाच्या आदेशाचे पालन साईमंदीरात पालन केलं जाणार असल्याच साई संस्थानच्या वतीनं करण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण याबाबत आवाज उठविल्यानंतर आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांचा वापराशिवाय झाली. कुर्ला येथील एससीएलआर जवळील विभागात तीन ते चार मोठ्या मशिदी आहेत. त्यामुळे इथे पहाटे 6 च्या आधीच मोठ्या आवाजात अजान होत असे. मात्र, आज या विभागात नमाज पठण झाले. पण लाउडस्पीकरवर अजाण झाली नाही. दरम्यान, मुंबईमधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टींनी एकत्र येत पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांशिवाय
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील अनधिकृत भोंगे आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण याबाबत आवाज उठविल्यानंतर आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पहाटेची अजान भोंग्यांचा वापराशिवाय झाली. कुर्ला येथील एससीएलआर जवळील विभागात तीन ते चार मोठ्या मशिदी आहेत. त्यामुळे इथे पहाटे 6 च्या आधीच मोठ्या आवाजात अजान होत असे. मात्र, आज या विभागात नमाज पठण झाले. पण लाउडस्पीकरवर अजाण झाली नाही. दरम्यान, मुंबईमधील काही मोठ्या मशिदीच्या ट्रस्टींनी एकत्र येत पहाटेची अजान स्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे.