(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra HSC Result : बारावीचा निकाल जाहीर, यंदाही कोकण विभाग अव्वल तर मुंबई विभाग तळाशी, जाणून घ्या कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के?
HSC Result : कोकणने विभागानं आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.91 % तब्बल टक्के लागला आहे. तर मुंबई सर्वात तळाशी आहे. मुंबईचा निकाल 91.95 % लागला आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य बारावीचा निकाल (Maharashtra Board 12th Result) अखेर घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra board result 2024) वेबसाईटवर हा निकाल दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा वर्ष 2024 चा निकाल हा टक्के लागला आहे. नक्की कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल लागला आहे हे बघूया. राज्यातून सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा लागला आहे. कोकणने विभागानं आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.91 % तब्बल टक्के लागला आहे. तर मुंबई सर्वात तळाशी आहे. मुंबईचा निकाल 91.95 % लागला आहे.
बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. राज्यात 9 विभागीय मंडळ मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी पास झाले. यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे. तर 26 विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 2.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के, कोण अव्वल, कोण तळाला जाणून घ्या
- कोकण 97.51 टक्के (सर्वात जास्त)
- नाशिक 94.71 टक्के
- पुणे 94.44 टक्के
- कोल्हापूर 94.24 टक्के
- संभाजी नगर 94.08 टक्के
- अमरावती 93 टक्के
- लातूर 92.36
- नागपूर 92.12 टक्के
- मुंबई 91.95 (सर्वात कमी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.
परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 3.84 टक्के अधिक मुली
यंदाच्या निकालात निकालात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 9751 टक्के तर मुंबईचा निकाल 91.95 टक्के लागला आहे. यंदाही बारावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली अग्रेसर आहेत. यावर्षी 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 91.60 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 3.84 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
Video :
हे ही वाचा :
HSC Result 2024: राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के; यंदाही मुलींची बाजी, तर कोकण विभाग सर्वात अव्वल!
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI