HSC Result 2024: राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के; यंदाही मुलींची बाजी, तर कोकण विभाग सर्वात अव्वल!
HSC Result 2024 Declared: महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा (12th Exam Result 2024) निकाल जाहीर झाला असून यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे.
Maharashtra HSC Class 12 Results : पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (Maharashtra HSC Results 2023 Declared) इयत्ता बारावीचा निकाल (12th Results) जाहीर झाला आहे. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना mahresult.nic.inया वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.
विभागनिहाय निकाल
- कोकण : 97.51 टक्के
- पुणे : 94.44 टक्के
- कोल्हापूर : 94.24 टक्के
- अमरावती : 93 टक्के
- छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
- नाशिक : 94.71 टक्के
- लातूर : 92.36 टक्के
- नागपूर : 93.12 टक्के
- मुंबई : 91.95 टक्के
कुठे पाहता येणार निकाल?
- mahresult.nic.in
- http://hscresult.mkcl.org
- www.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
- http://results.targetpublications.org
कसा पाहाल निकाल?
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.
- निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.
- संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याचं होमपेज ओपन होईल. तेथे महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2024 या ऑप्शनवर क्लिक करा.
- या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर तुमचा सीट क्रमांक किंवा परीक्षा क्रमांक टाकण्याचा ऑप्शन दिसेल. काही संकेतस्थळांवर तुम्हाला रोल नंबर किंवा शाळेचा कोड विचारला जाऊ शकतो. विचारण्यात आलेली माहिती भरुन सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 3.84 टक्के अधिक मुली
यंदाच्या निकालात निकालात कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 9751 टक्के तर मुंबईचा निकाल 91.95 टक्के लागला आहे. यंदाही बारावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली अग्रेसर आहेत. यावर्षी 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 91.60 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 3.84 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
बारावीच्या निकालाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून पुणे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती नाशिक, लातूर, कोकण या ९ विभागीय मंडळात राज्यभर परीक्षा घेण्यात आली होती. मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी, गुजराती आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
- विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम, आयटीआय या अभ्यासक्रमाच्या एकूण 14 लाख 33 हजार 371 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भरला होता. त्यापैकी 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यामुळे एकूण उत्तीर्णांची टक्केवारी 93.37 टक्के इतकी नोंदवण्यात आली.
- या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 45,448 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 45,083 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 22,463 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 49.82 आहे.
- खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 41,362 एवढी असून त्यापैकी 40,795 विद्यार्थी प्रविष्ट झाले असून 34,988 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी 85.76 आहे.
- या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण 7032 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 6986 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी 6581 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 94.20 आहे.
- इ.12 वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
- सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (97.51 %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (91.95 %) आहे.
- सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल 95.44 % असून मुलांचा निकाल 91.60% आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.84% ने जास्त आहे.
निकालाबाबत आक्षेप असेल किंवा गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना काय करावं लागेल?
निकाल हाती आल्यानंतरही अनेकांना आपल्या निकालाविषयी आक्षेप असू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत आक्षेप असेल अशा विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी, गुणांच्या पडताळणीसाठी अर्ज करावा लागेल. यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरुन (http://verification.mh- hsc.ac.in) विद्यार्थ्यांना स्वत: किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फे अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
यासाठी आवश्यक अटी/शर्ती आणि सूचना वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी 22 मे ते 5 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या काळात विद्यार्थी ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. शिवाय यासाठी आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) भरता येईल.
गुण पडताळणीसाठी बुधवार, 22 मे ते बुधवार, 5 जूनपर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक राहील. गुणपडताळणीसाठी प्रती विषय 50 रुपये इतकं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं मंडळाकडे जमा करावं लागेल.
फेब्रुवारी-मार्च 2024 च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी
1. ई-मेलद्वारे/संकेतस्थळावरुन
2. हस्तपोहोच
3. रजिस्टर पोस्टाने यापैकी एका पर्यावाची निवड करता येईल आणि त्यांनी मागणी केलेल्या पध्दतीने छायाप्रती उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, यासाठी विद्याथ्यांनी संबंधित विभागीय मंडळाकडे बुधवार, 22 मे ते बुधवार, 5 जूनपर्यंत विहित नमुन्यात उपरोक्त संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणं आवश्यक राहील. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी प्रति विषय 400 रुपये इतकं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं मंडळाकडे जमा करावं लागेल.
उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी काय कराल?
1. फेब्रुवारी मार्च 2014 च्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात प्रति विषय 300 रुपयांप्रमाणे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरत संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक राहील
2. विविध स्पर्धा परीक्षा, प्रवेश पात्रता (उदा. जेईई नीट इत्यादी) परीक्षेसाठी प्रक्रिया होणाऱ्या विज्ञान शाखेच्या विद्याध्यांच्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत व पुनर्मूल्यांकन तातडीने आणि प्राधान्याने करून देण्याबाबत सर्व विभागीय मंडळाना सूचना देण्यात येत आहेत. त्यासाठी त्यांनी सदर परीक्षेच्या प्रवेशपत्राची प्रत विषय शिक्षकांच्या अभिप्रायासोबत अपलोड करावी.
3. ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (IT) आणि सामान्य ज्ञान (G.K.) या विषयांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करून देण्यात येणार आहे. त्यासाठी देखील उपरोक्त पद्धतीनं ऑनलाईन अर्ज करणे आणि ऑनलाईन शुल्क भरणे आवश्यक राहील.
15 लाख विद्यार्थ्यांनी दिली बारावीची परीक्षा
राज्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांच्या वतीनं नोंदणी करण्यात आलेली होती. बारावीचे विद्यार्थी आणि पालकांची निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.
पाहा व्हिडीओ : HSC Result LIVE
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI