(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis Press Conference TOP Points : एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री ते उद्धव ठाकरेंवर निशाणा.... फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत अनपेक्षित निर्णयाची घोषणा केली. दरम्यान या घोषणेपूर्वी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. जाणून घ्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
Maharashtra Government Formation : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा उलटफेर आज राजभवनात पाहायला मिळाला. शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत अनपेक्षित निर्णयाची घोषणा केली. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. सोबतच स्वत: देवेंद्र फडणवीस नव्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतलाय. दरम्यान या घोषणेपूर्वी फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. जाणून घ्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
निकालानंतर शिवसेनेने निर्णय बदलला
2019 साली भाजप आणि युतीचे सरकार होईल अशी अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने त्यावेळचे आमचे मित्र शिवसेनाप्रमुखांनी वेगळा निर्णय घेतला. बाळासाहेब ठाकरेंनी आजन्म ज्यांचा विरोध केला, अशा कॉंग्रेससोबत युती केली. जनतेने युतीला मत दिले होते. परंतु निकालानंतर शिवसेनेने निर्णय बदलला. शिवसेनेने जनतेच्या मताचा अपमान केला
महाविकासआघाडीतील दोन मंत्री तुरूंगात
बाळासाहेब ठाकरेंनी दाऊचा विरोध केला. महाविकासआघाडीतील दोन मंत्री तुरूंगात गेले. त्यांना उद्धव ठाकरेंनी जवळ केले.
काल घेतलेल्या कॅबिनेटमधील काही निर्णयांवर पुर्नविचार
काल घेतलेल्या कॅबिनेटमधील काही निर्णयांवर पुर्नविचार करण्यात येणार आहे. ते निर्णय आम्हाला मान्य आहे.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री
ही हिंदुत्वाची लढाई आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार आहे एकनाथ शिंदे एकटेच मुख्यमंत्री होतील.
एकनाथ शिंदेंच्या सरकारला भाजपचा पाठिंबा
एकनाथ शिंदेंच्या सरकारला भाजपचा पाठिंबा असणार आहे. मी मंत्रीमंडळात नसेल पण माझा पुर्ण पाठिंबा या सरकारला आहे. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचे सरकार येणार आहे.
जनतेच्या प्रश्नांना पुढे नेणारे सरकार : शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हिजन पुढे नेणारे हे सरकार येणार आहे. मेट्रो, वेगवेगळे प्रोजेक्ट असतील, प्रत्येक घटनांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे.
फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मोठे केले : शिंदे
देवेंद्र फडणवीसांकडे 120 संख्याबळ आहे. त्यांना सहज मुख्यमंत्री होता आले असते. पण फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मोठेपणा दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो
महाविकास आघाडीत अनेक अडचणी - एकनाथ शिंदे
गेल्या काही काळात मुख्यमंत्र्यांना मतदार संघातील अडचणी, विकास प्रकल्पांची माहिती दिली. मी देखील चर्चा केली. आमदारांची नाराजी होती. महाविकास आघाडीत अनेक अडचणी येत होत्या
हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार - एकनाथ शिंदे
बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार आहे. महाराष्ट्राचा विकास करणार आहे. शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार माझ्यासोबत आहे.
50 आमदार वेगळी भूमीका घेतात म्हणजे आत्मपरीक्षणाची गरज आहे : शिंदे
50 आमदार वेगळी भूमीका घेत असेल तर त्याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज होती. ग्रामपंचायतीचे सदस्य देखील विरोध करत आहे. हा निर्णय दुर्दैवाने आम्हाला घ्यावा लागला.
महाराष्ट्राच्या हितासाठी अहोरात्र काम करणार : शिंदे
महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतला, महाराष्ट्राच्या हितासाठी अहोरात्र काम करणार आहे. फडणवीसांच्या विश्वाला तडा देणार नाही.