एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रात सहा नवी केंद्रं
नीट परीक्षेच्या महाराष्ट्रातील सहा नव्या केंद्रांमध्ये मुंबई उपनगर, बीड, बुलडाणा, जळगाव, लातूर आणि सोलापूरचा समावेश आहे.
नवी दिल्ली : नीट 2018 परीक्षेसाठी यंदा 43 नव्या केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. पहिल्यांदाच नीट परीक्षा एकूण दीडशे शहरांमध्ये पार पडणार. यामध्ये महाराष्ट्रातील सहा नव्या केंद्रांचा समावेश आहे.
आतापर्यंत देशातील 107 सेंटर्सवर नीटची परीक्षा घेतली जात असे. यावेळी महाराष्ट्रातील सहा केंद्रांसह 43 केंद्रांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई उपनगर, बीड, बुलडाणा, जळगाव, लातूर आणि सोलापूरचा समावेश आहे.
मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यांसदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. नीट 2018 परीक्षा रविवारी 6 मे रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे.
नीटसाठी राज्यात आतापर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, सातारा आणि कोल्हापूर ही दहा केंद्रं होती. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण केंद्रांची संख्या 16 वर पोहचली आहे.
सुरुवातीला नीट परीक्षा राज्यात फक्त सहाच केंद्रांवर घेतली जात होती. विद्यार्थ्यांनी ओरड केल्यानंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यात चार केंद्रं वाढवण्यात आली. मराठवाड्यातील फक्त औरंगाबाद हे एकच केंद्र असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात होती. आता बीड आणि लातूरची भर त्यात पडली आहे.
मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते. 9 मार्चला रात्री 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत परीक्षेसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत आहे. नीटच्या नोंदणीसाठी आवश्यक माहिती परीक्षार्थींना त्यांचा आधार कार्ड क्रमांक देणं बंधनकारक आहे. जर आधार कार्डमधील माहितीत साधर्म्य आढळलं नाही, तर विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठीचा फॉर्म भरता येणार नाही. नीटची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना www.cbseneet.nic.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरता येईल.1400 रुपये प्रवेश शुल्क (एससी, एसटी उमेदवारांसाठी 750 रुपये) आकारण्यात येईल. डेबिट/क्रेडीट कार्ड, यूपीआय किंवा नेटबँकिंगद्वारे हे पेमेंट करता येईल. उमेदवार 17 ते 25 वर्ष वयोगटातील असावा. एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा 30 वर्ष आहे. बारावीची परीक्षा देणारे विद्यार्थीही नीटसाठी नोंदणी करु शकतात.6 new centres for #NEET2018 exam in Maharashtra – Beed, Buldhana, Jalgaon, Latur, Mumbai-Suburban, Solapur#TransformingIndia #NewIndia #IT4MHRD @CBSEINDIA @ciet_ncert
— Prakash Javadekar (@PrakashJavdekar) February 27, 2018
संबंधित बातम्या:
नीट 2018 परीक्षेची तारीख जाहीर
नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रात चार नवी केंद्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement