Maharashtra Din 2023 Live Updates : महाराष्ट्र दिनाला विदर्भवाद्यांचा विरोध
Maharashtra Din 2023 Live Updates : आज महाराष्ट्र दिन (Maharashtra Din 2023) आहे. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.
LIVE
Background
Maharashtra Din 2023 Live Updates : आज महाराष्ट्र दिन (Maharashtra Din 2023) आहे. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण आजच्या दिवशी केले जाते.
आजच्या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिनी महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.
महाराष्ट्र दिनाचा इतिहास
21 नोव्हेंबर इ.स.1956 दिवशी फ्लोरा फाऊंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसं प्रचंड चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाऊंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली.
106 आंदोलकांचं हौतात्म्य
स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र, राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुंबई मराठी माणसांपासून तोडली जात असल्याची एक चीड त्यावेळ धुमसत होती. त्यामुळे 21 नोव्हेंबर 1956 रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांनी एक मोर्चा काढला. यावेळी आंदोलकांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पोलिसांना हा मोर्चा आवरणे कठीण झाले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. परंतु,जमाव पांगला नाही. त्यामुळे मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. पोलिसांनी गोळीबार केला आणि या गोळीबारात 106 आंदोलकांना हौतात्म्य आलं.
जळगावातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन भरपाई दिली जाईल, गिरीश महाजन यांचं आश्वासन
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा, विदर्भात आज वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा अंदाज
Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी
विदर्भात आज वादळी वाऱ्यांसह गारपिटीचा अंदाज
मराठवाड्यात आज आणि उद्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता
मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा इशारा
मुंबई, ठाण्यात काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज
राज्यात 5 मे नंतर अवकाळी पाऊस कमी होणार
महाराष्ट्र दिनानिमित्त गडचिरोली येथील पोलीस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते ध्वजारोहण
Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त गडचिरोली येथील पोलीस कवायत मैदानावरील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल व इतर अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
बार्शीच्या सुलाखे हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिनानिमीत्त ध्वजारोहणचा कार्यक्रम
बार्शीच्या सुलाखे हायस्कूल मध्ये महाराष्ट्र दिनानिमीत्त ध्वजारोहण चा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सुलाखे हायस्कूल बार्शी च्या शतकीय वर्षाचा पाहिला अंक,
शाळेचे/संस्थेचे मुखपत्र 'संवाद' चे विमोचन करण्यात आले.
महाराष्ट्र दिनी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपूरमध्ये आंदोलन
Maharashtra Din 2023 : महाराष्ट्र दिनी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं आंदोलन करत काळे कपडे परिधान करुन विदर्भ चण्डिका मंदिरात आरती करून निषेध नोंदवण्यात आला. वेगळे विदर्भ राज्य झालाच पाहिजे आणि ते घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला महाराष्ट्रात राहायचं नाही अशी मागणी करत आजच्या दिवशी निषेध नोंदवण्यात आलाय. विदर्भ राज्य निर्मितीसाठीचा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आज उमरेड कोळशाच्या खाणीवर आंदोलनचा नारा दिलाय. महाराष्ट्रात राहून विदर्भाची दुर्दशा झाली आहे.