Corona Vaccination Suspended : कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे पुढचे दोन दिवस मुंबईसह महाराष्ट्रातील लसीकरण रद्द
सरकारने व्हॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठी विकसित केलेल्या कोविन अॅपमध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे उद्या (17 जानेवारी) मुंबईसह महाराष्ट्रातील लसीकरण रद्द करण्यात आले आहे.
मुंबई : देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 18 हजार 338 हून अधिक म्हणजे सुमारे 64 टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आल्यानंतर लसीकरणाच्या मोहिमेत तांत्रिक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे उद्या (17 जानेवारी) मुंबईसह महाराष्ट्रातील लसीकरण रद्द करण्यात आले आहे.
सरकारने व्हॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठी तयार केलेल्या अॅप विकसित केलेल्या कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे उद्या मुंबईसह महाराष्ट्रातील लसिकरण रद्द करण्यात आले आहे. सोमवारी (18 जानेवारी) लसीकरण होण्याची शक्यता कमी आहे.
COVID19 vaccination temporarily suspended till 18th January in the entire state of Maharashtra due to technical issues with CoWIN App: State Health Department
— ANI (@ANI) January 16, 2021
ऑफलाईन माध्यमातून लसीकरण न करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, सुरुवातीला आठवड्यातून चारच दिवस लसीकरण करण्याबाबतही केंद्राच्या सूचना आलेल्या आहे. आजही कोविन अॅपमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी पुढील दोन दिवस लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. कोविन अॅपमध्ये लाभार्थ्यांचे नाव सेव्ह होते. मात्र, ते स्क्रिनवर दिसत नाही.
पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 18 हजार 338 हून अधिक म्हणजे सुमारे 64 टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते. लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षीत असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
सायंकाळी 7 वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारीअकोला (238), अमरावती (440), बुलढाणा (575), वाशीम (167), यवतमाळ (307), औरंगाबाद (647), हिंगोली (200), जालना (287), परभणी (371), कोल्हापूर (570), रत्नागिरी (270), सांगली (456), सिंधुदूर्ग (165), बीड (451), लातूर (379), नांदेड (262), उस्मानाबाद (213), मुंबई (660), मुंबई उपनगर (1266), भंडारा (265), चंद्रपूर (331), गडचिरोली (217), गोंदिया (213), नागपूर (776), वर्धा (344), अहमदनगर (786), धुळे (389), जळगाव (443), नंदुरबार (265), नाशिक (745), पुणे (1795), सातारा (614), सोलापूर (992), पालघर (257), ठाणे (1740), रायगड (260)