Maharashtra Corona Update : तब्बल 12 मंत्री, 70 आमदारांना कोरोनाचा संसर्ग, महाराष्ट्रात Covid 19 चा धुमाकूळ
महाराष्ट्रात कोरोना (Corona) रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ( Maharashtra Government ) 12 मंत्र्यांसह जवळपास 70 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राजकीय नेतेमंडळींभोवतीही कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील (Maharashtra Government) 12 मंत्र्यांसह विविध पक्षांतील जवळपास 70 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज मुंबईत होणारी राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठकही रद्द करण्यात आली आहे.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या मंत्र्यांमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, के. सी. पाडवी आणि प्राजक्त तनपुरे यांच्याहस इतर 6 मंत्र्यांचा समावेश आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
आमदार रोहित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, सागर मेघे, शेखर निकम, इंद्रनील नाईक, निलय नाईक, माधुरी मिसाळ चंद्रकात पाटील (मुक्ताईनगर) आणि आमदार किसन कथोरे यांच्यासह 61 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबरोबरच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील-ठाकरे (हर्षवर्धन पाटील यांची मुलगी), दीपक सावंत आणि रामकृष्ण ओझा या नेत्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
... तर राज्यात कडक निर्बंध?
कोरोना रूग्णांची आकडेवारी अशीच वाढत राहिली तर राज्यात कडक निर्बंध लावावे लागतील असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यात 20 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली होती. दुसऱ्या लाटेत ही संख्या 40 लाखांवर पोहोचली होती. दुर्देवाने कोरोनाची तिसरी लाट आली तर राज्यातील जवळपास 80 लाख लोकांना कोरोनाची बाधा होईल अशी भीती मंत्री टोपे यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या