एक्स्प्लोर

Maharashtra Corona : राज्यात तुर्तास लॉकडाऊन नाही मात्र कडक निर्बंध लावले जाणार,आज नवीन नियमावली

Maharashtra Corona Omicron lockdown updates: राज्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला नाही. मात्र निर्बंध आणखी कडक करण्याचा सरकारचा विचार आहे. आज रात्री नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे

Maharashtra Corona Omicron lockdown updates:  संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या बैठकीकडे लागलं होतं, ती मंत्रालयातील बैठक नुकतीच संपली आहे. सध्या तरी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला नाही. मात्र निर्बंध आणखी कडक करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. आज उशीरा रात्री नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. मंत्रालयातील बैठकीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सोपवला जाणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्री कोणत्या निर्बंधांना हिरवा कंदील दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. 

आज रात्रीपर्यंत कडक निर्बंधाची नियमावली जाहीर होणार आहे, अशी माहिती आहे. आज बैठकीत जी चर्चा झाली त्याची माहिती मुख्यमंत्री यांना दिल्यानंतर मुख्यमंत्री आज निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती आहे.  टास्क फोर्स सोबत राज्यातील कोरेनाचा आढावा देखील या बैठकीत घेण्यात आला.  उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देऊ नका. त्याचप्रमाणे निधीला कात्री लावू नका, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाला आजच्या बैठकीत दिल्या आहेत.

राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असून मंगळवारी कोरोनाच्या तब्बल 18 हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची भर पडली आहे.  राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लावण्यात येणार नसून निर्बंध कडक करण्यात येतील, असं आरोग्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं.   कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे.  राज्यातील ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. काल (मंगळवारी) राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी 75 रुग्णांची नोंद झाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
मोठी बातमी! कोयनेचं पाणी भागवणार मुंबईकरांची तहान, तब्बल 67 TMC नवीन पाणीसाठी उपलब्ध होणार, पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करणार, नेमका काय आहे निर्णय?
मोठी बातमी! कोयनेचं पाणी भागवणार मुंबईकरांची तहान, तब्बल 67 TMC नवीन पाणीसाठी उपलब्ध होणार, पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करणार, नेमका काय आहे निर्णय?
Marathi Gaurav Awards : विचारे प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव! क्रीडा अन् पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गजांचा 'मराठी गौरव पुरस्कारा'ने सन्मान
विचारे प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव! क्रीडा अन् पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गजांचा 'मराठी गौरव पुरस्कारा'ने सन्मान
Devendra Fadnavis And Sadhguru: राजकारण्यांना अधिक चांगले नेतृत्व आणि माणूस बनण्यासाठी कोणता एक सल्ला द्याल?, फडणवीसांचा प्रश्न; सद्गुरू म्हणाले...
राजकारण्यांना अधिक चांगले नेतृत्व आणि माणूस बनण्यासाठी कोणता एक सल्ला द्याल?, फडणवीसांचा प्रश्न; सद्गुरू म्हणाले...

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Ashish Shelar on Shiv Sen Sonia Gandhi Book : शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
शिवसेना प्रवक्त्यांनी सोनिया गांधींचं पुस्तक फाडलं; अशिष शेलार थेट म्हणाले, 'पुस्तक फाडणं मला मान्य नाही; मी कधीच पुस्तक फाडलं नाही...'
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
भाजपा आमदार रेखा पात्रांची प्रकृती चिंताजनक, विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती; आरोग्यमंत्र्यांनी घेतली भेट
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आधीच दुष्काळ, त्यात शेतातील विद्युत तारांच्या स्पर्शाने भीषण आग, शेतकऱ्याचा पाच एकरावरील ऊस जळून खाक
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
आत्तापर्यंत झोपा काढत होतात का? विमान दुर्घटनेच्या तपासावरुन हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल
Hemant Nimbalkar : अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
अपुन के एरिया में लफड़ा नहीं! सुधारायचे असेल तर ठीक, नाहीतर पोलिसांची बंदूक फक्त 'शो'साठी नाही; बेंगळुरुच्या सुरक्षेची जबाबदारी मिळताच हेमंत निंबाळकरांचा गुंडांना इशारा 
Embed widget