Maharashtra CM : आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना शुभेच्छा
एकनाथ शिंदेच्या शिंदेशाहीला सुरूवात झाली. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, असे म्हणत आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई: उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि गेली दोन वर्षे सात महिने सत्तेवर असलेलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. आजपासून एकनाथ शिंदेच्या शिंदेशाहीला सुरूवात झाली. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, असे म्हणत आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या आहेत
महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून श एकनाथ शिंदे यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली. उद्धव ठाकरेंनी ट्विट करत एकनाथ शिंदेना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही इच्छा
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 30, 2022
'शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार, शिवसैनिकांची सेवा करणार, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित होते. मात्र आज देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केला
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर विधिमंडळात बहुमत चाचणी करण्याचे आदेश राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिले होते. त्याला सुप्रीम कोर्टातही आव्हान देण्यात आलं. पण कोर्टानं आजच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानं उद्धव ठाकरे त्याआधीच राजीनामा देऊन मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. मुख्यमंत्रिपदाबरोबरच विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा त्यांनी दिला.
संबंधित बातम्या :
Eknath Shinde : बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक, शपथविधीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डीपी बदलला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
