Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की...., एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पार
Oath Ceremony : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मुंबई : मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की..... असा एकच आवाज दुमदुमला आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
आज राजभवनमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. केंद्रीय नेतृत्वाच्या आग्रहानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. गोव्याहून आल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता.
एकनाथ संभाजी शिंदे
जन्म : 6 मार्च 1964.
जन्म ठिकाण : अहिर, तालुका-महाबळेश्वर, जिल्हा-सातारा.
शिक्षण : बी.ए.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती लता. अपत्ये : एकूण 1 (एक मुलगा).
व्यवसाय : उद्योग व सामाजिक कार्य. पक्ष : शिवसेना.
मतदारसंघ : 147 -कोपरी-पाचपाखाडी, जिल्हा-ठाणे.
भाजपच्या उमेदवाराला 89 हजार 300 मतांनी हरवून विजयी
शिंदे यांना पडलेली मतं - 1 लाख 13 हजार 495
भाजपच्या संजय घाडीगावकर यांना पडलेली मतं - 24 हजार 197
एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द :
1997 व 2002 दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.
2004, 2009,2014,2019 चार वेळा आमदार;
2014 ते 2019 विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते;
12 नोव्हेंबर 2014 ते 5 डिसेंबर 2014 विधानसभा विरोधी पक्ष नेता,
5 डिसेंबर ते नोव्हेंबर 2019 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री; तसेच जानेवारी 2019 सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री;
ऑक्टोबर 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; डिसेंबर 2019 पासून शिवसेनेचे गटनेते;
नोव्हेंबर 2019 पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री.